Published On : Mon, Oct 5th, 2020

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले 7 व 8 ऑक्टोंबरला जिल्हा दौऱ्यावर

भंडारा : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले 7 व8 ऑक्टोंबर 2020 रोजी भंडारा जिल्हयाच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

7 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी 10.45 साकोली येथे आगमन व सुरेश बघेल यांचे निवास स्थानी सांत्वनपर भेट. 11.30 यशपाल कऱ्हाडे यांचे निवास स्थानी सांत्वनपर भेट. दुपारी 1 वाजता लाखांदूर येथे आगमन व बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे उद्घाटन, दुपारी 2 वाजता तहसील कार्यालय लाखांदूर येथे कोविड-19 संदर्भात बैठक. दुपारी 3 वाजता आदिवासी शासकीय मुलींचे वसतीगृह पिंपळगाव रोड लाखांदूर येथील कोविड सेंटरला भेट.

Advertisement

दुपारी 4 वाजता भारत इंगळे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. 4.30 वाजता दिनेश कुळेगांवे यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट. 5.30 वाजता अनुराग ढवळे यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट. 6 वाजता निलकंठ चौधरी यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट सोईनुसार सुकळी येथे आगमन व राखीव.

8 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता मौजा जाख (मुजबी) येथे आगमन व गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीच्या धान्य गोदामाचे उद्घाटन, दुपारी 12 वाजता जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे कोविड-19 संदर्भात आढावा बैठक. दुपारी 1 वाजता कोविड केअर सेंटरला भेट. दुपारी 3 वाजता नगरपरिषद भंडारा अंतर्गत म्हाडा कॉलनी येथे विकास कामाचे भुमीपुजन. दुपारी 4.30 वाजता सुनील तिरमारे यांच्या निवासस्थानी भेट, सायंकाळी 4.30 वाजता कन्हाळगांव (लाखांदूर) येथे भेट व सोईनुसार भंडारा येथे आगमन व त्यानंतर सुकळी कडे प्रस्थान.

Advertisement
Advertisement
Advertisement