Published On : Thu, Oct 31st, 2024
By Nagpur Today Nagpur News

विधानसभा निवडणूक; कृषी संकटात महाराष्ट्रातील आघाडीचे नेते करोडपती ‘शेतकरी’ कसे ?

Advertisement

नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व उमेदवारी अर्ज दाखल केले. यादरम्यान त्यांचा संपत्तीचा आकडा समोर आला आहे.यात अनेक नेत्यांनी शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते असल्याचे सांगितले. या नेत्यांची संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (एमपीसीसी) अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री आदित्य ठाकरे आदी प्रमुख कोट्यधीश शेतकऱ्यांच्या रिंगणात आहेत. छाननीतून शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाकडे 37.67 कोटी रुपयांची मालमत्ता आहे, ज्यात 9.21 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 28.46 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

त्याचप्रमाणे, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जे पाच वेळा आमदार झाले आहेत. अजित पवार यांच्याकडे अनुक्रमे 13.27 कोटी आणि 124.54 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. महाराष्ट्रातील प्रमुख तीन नेत्यांमध्ये पवार यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे. महायुतीचे तीन प्रमुख मंत्री शेती हा व्यवसाय म्हणून ओळखतात. त्याचप्रमाणे, विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, ज्यांची सर्वोच्च पात्रता इयत्ता 10 आहे, त्यांच्याकडे 94.54 कोटी रुपयांची कौटुंबिक मालमत्ता आहे. तर शेती हा त्यांचा प्राथमिक व्यवसाय आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ते देखील 5.28 कोटी रुपयांच्या संपत्तीसह कोट्यधीश आहेत आणि स्वत:ला शेतकरी म्हणवतात. शेतीशी संबंधित व्यवसाय करतात. भाजपचे बावनकुळे आणि काँग्रेसचे पटोले हे दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे प्रदेशाध्यक्ष कोट्यधीश शेतकरी आहेत.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तीन वेळा आमदार राहिलेल्या बावनकुळे यांच्याकडे 48.55 कोटी रुपयांची मालमत्ता असून त्यात पत्नीच्या नावावर 43.82 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. शिवसेनेचे (UBT) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे पुत्र असलेले राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांची 23.43 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख देतात. 2019-20 ते 2023-24 या पाच आर्थिक वर्षात त्यांनी 6.04 कोटी रुपये कमावले.

आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) तिकिटावर उमेदवारी दाखल केलेले माजी गृहमंत्री आणि विद्यमान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ६.०६ कोटी रुपयांची मालमत्ता असून ते व्यवसायाने शेतकरी आहेत, असे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. महाराष्ट्राचे दिग्गज नेते आणि सध्याचे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक व्यवहार मंत्री छगन भुजबळ, ज्यांनी येवल्यातून राष्ट्रवादीच्या (अजित पवार) तिकिटावर उमेदवारी दाखल केली, त्यांच्याकडे 30.93 कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर त्यांचा व्यवसाय शेती आहे, त्यांनी त्यांच्या मतदान प्रतिज्ञापत्रातून खुलासा केला आहे. चार्टर्ड अकाउंटंट जुल्फेश शाह म्हणाले की, जर कोणी शुद्ध कृषी उत्पन्न दाखवले तर त्याला किंवा तिला संपूर्ण आयकर सवलत मिळते.तसेच, इतर उत्पन्नासोबत शेतीचे उत्पन्न दाखविल्यास त्या व्यक्तीला किरकोळ दिलासा मिळतो,” असे शहा म्हणाले.

Advertisement
Advertisement