Published On : Thu, Feb 18th, 2021

आसीनगर झोन सभापती वंदना चांदेकर यांनी स्वीकारला पदभार

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आसीनगर झोन सभापतीपदी निवडून आलेल्या वंदना राजू चांदेकर यांनी बुधवारी (ता.१७) सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. आसीनगर झोन कार्यालयाच्या परिसरात पदग्रहण समारंभात त्यांनी झोन सभापती म्हणून सुत्र हाती घेतली.

कार्यक्रमाला मावळत्या झोन सभापती विरंका भिवगडे, बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे, दुर्बल घटक समिती सभापती गोपीचंद कुमरे, नगरसेवक सर्वश्री मनोज सांगोळे, संदीप सहारे, जितेंद्र घोडेस्वार, इब्राहिम तौफीक अहमद, मो. जमाल, परसराम मानवटकर, दिनेश यादव, नगरसेविका मंगला लांजेवार, भावना लोणारे, नेहा निकोसे, भाग्यश्री कानतोडे, नसीम बानो इब्राहिम खान, आसीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, बसपाचे प्रदेश महासचिव भाउसाहेब गोंडाणे, जिल्हा प्रभारी नागोराव जयकर, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, प्रदेश सचिव उत्तम शेवडे, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, उत्तर नागपूरचे माजी अध्यक्ष अविनाश नारनवरे आदी उपस्थित होते.

ज्या जनतेने विश्वासाने नगरसेवक म्हणून निवडून दिले त्याच जनतेच्या सेवेकरिता दुस-यांदान सभापती म्हणून जबाबदारी मिळाली आहे. या सभापतीपदाचा उपयोग जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात येईल. नागरिकांच्या सेवेसाठी मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हे कर्तव्य आहे. नागरिकांच्या विश्वासामुळेच इथपर्यंत पोहोचता आले त्यामुळे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे, असा विश्वास नवनिर्वाचित झोन सभापती वंदना चांदेकर यांनी व्यक्त केला.