Published On : Tue, Sep 26th, 2017

श्री महाकाली मंदिरात अश्विन नवरात्र महोत्सवाची सुरूवात.

कन्हान : पावन नदीच्या काठावर स्थित कन्हान सत्रापुर मार्गांवर पुरातन जागृत श्री महाकाली माता मंदिरात अश्विन नवरात्र महोत्सवाचे सुरूवात घट स्थापना करून करण्यात आली. श्री महाकाली मंदिरात अश्विन नवरात्र महोत्सवाची सुरूवात सोमवारी २५ सप्टेंबर २०१७ ला सकाळी १२ वाजता मा सनदंजी गुप्ता, जितु महाराज, श्रीपाद मुळे यांचा शुभ हस्ते घट स्थापना करण्यात आली. नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी ३ ऑक्टोंबर २०१७ ला सायंकाळी ६ वाजता कन्हान नदीच्या पावन पात्रात विसर्जन करून रात्रीचे ९ वाजे पर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात येईल. या अश्विन नवरात्र महोत्सवाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री महाकाली सेवा समिती सत्रापुर कन्हान चे उपाध्यक्ष श्री सनदजी गुप्ता यांनी केले आहे.

महोत्सवाच्या यशस्विते करिता आमदार श्री विकास कुंभारे, अँड. श्रीकृष्ण जोशी, दामोधर रोकडे, महेश महाजन, अर्जुन पात्रे, कैलाश भिवगडे, रामचंद्र पात्रे, अँड. विजय धोटे, शरद शर्मा, अँड. संजय बालपांडे, रवी आग्रे, अजय मोगरे, श्रीपाद मुळे, आदेश गुप्ता, अनिल आष्टणकर, सौ उषाताई पात्रे, अमोल ठाकरे, श्रीकांत आगलावे, शरद वाटकर, शरदराव नान्हे, ओमप्रकाश डेलीकर, महेश सबळ, अनुपजी गुप्ता, दिपक पुरवले, डॉ. मधुकर मोहाडीकर, सतिश जुनघरे, संजय रोकडे, उमेश पानतावणे, अजय हिंगे, भुषण छानिकर, किरण राकडे, डॉयनल शेंडे, दिलीय मरघडे, देविदास खडसे, नंदु सोनवणे, अनवर खडसे, अनिल लोंढे, अँड. प्रविण खांडेकर, विनायक डेहनकर, शैलेंश दिवे, पांडुरंग भागवत, गोविंदा ठवरे, वैभव लक्षणे, मनीष चौकसे, प्रकाश कडू, सुनिल भोसले सहित परिसरातील भाविक मंडळीं अथक परिश्रम घेत आहे.