Published On : Tue, Sep 26th, 2017

महावितरणच्या लेखा विभागातील कर्मचाऱ्यांची कार्यशाळा

Advertisement

नागपूर: महावितरणच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची २ दिवसीय कार्यशाळा नागपूर परिमंडळ कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत उपविभागात देयकाशी संभाधित कर्मचारी सहभागी झाले होते. आधुनिकीकरणामुळे बदल झालेली परिस्थितीला आपण कसे समोर जायचे यावर तज्ञांनी मार्गदर्शन केले.

महावितरणच्या कार्य प्रणालीत लेख विभाग हा महत्वाचा दुआ आहे. यामुळे सर्व कर्मचारी वर्गाने योग्य पद्धतीने काम केले तर अचुक देयक ग्राहकास देता येईल तसेच महावितरणच्या महसुलात पण वाढ होईल याकडे सर्वानी लक्ष वेधले. जुनी नोंद घेण्याची पद्धत आता कालबाह्य झाली असून मोबाइलला अँपच्या माध्यमातून नोंदी घेतल्या जात आहेत. यामुळे कर्मचारी वर्गाने आता आधुनिकतेची कास धरणे गरजेचे आहे.

या शिवाय सॅप प्रणालीमुळे सर्व माहिती संगणकावर एका क्लीकवर मिळणे शक्य झाले आहे. शून्य वीज वापर असलेल्या ग्राहकांचा शोध घेऊन योग्य वापराचे देयक अदा केले तर उपविभाग, विभाग आणि मंडळ कार्यालयाची हानी कमी करता येणे शक्य आहे या कडे सर्वांचे लक्ष वेधले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी लेखाधिकारी आरती कानडे, प्रशांत ठाकरे, प्रणाली विश्लेषक हेमंत देशपांडे यांनी मेहनत घेतली .