Published On : Wed, May 2nd, 2018

अश्विन मुदगल यांनी नासुप्र सभापती आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महानगर आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली

Ashwin Mudgal

नागपूर: अश्विन मुदगल यांनी आज नासुप्र सभापती व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महानगर आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. नासुप्रचे महाव्यवस्थापक अजय रामटेके यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

अश्विन मुदगल यांनी पदग्रहण करताच नासुप्र व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा आढावा घेत संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेतली व नासुप्र आणि ना.म.प्र.वि.प्रा. चे अधिकारी, विभागीय अधिकारी यांची ओळख करून घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेंथे, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार, अधीक्षक अभियंता (प्रकल्प) राजीव पिंपळे, कार्यकारी अधिकारी प्रशांत भांडारकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.