Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Apr 19th, 2018

  अश्विन मुदगल यांनी स्विकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

  Sachin Kurve and Ashwin Mudgal
  नागपूर: नागपूरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून अश्विन मुदगल यांनी मावळते जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडून आज पदभार स्विकारला.

  यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र कुंभारे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्रखजांजी, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीमती मनीषा जायभाये व इतर अधिकारी उप‍‍स्थित होते.

  मावळते जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी नूतन जिल्हाधिकारी यांना पदभाराची सूत्रे देताना शुभेच्छा दिल्या. तसेच नूतन जिल्हाधिकारी यांनी पदभार स्विकारुन सचिन कुर्वे यांना शुभेच्छा देत निरोप दिला.

  नूतन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पदभार स्विकारल्यानंतर राज्य शासनाचे जलयुक्त शिवारसारखे विविध ‘फ्लॅगशिप’ कार्यक्रमप्राधान्याने राबवणार असून, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी योग्य नियोजन, मेट्रो प्रकल्पासाठी भूसंपादन, तसेच निवडणुकीतील मतदानाचीटक्केवारी वाढविण्यावर विशेष भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. श्री. मुदगल यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, 2014 ते2017 दरम्यान सातारा जिल्हाधिकारी, 2012 ते 2014 यवतमाळ जिल्हाधिकारी, 2009 ते 2012 सांगली जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, 2009 मध्ये ते पंढरपूर येथे सहायक जिल्हाधिकारी आणि त्यापूर्वी 2007 ते 2009 दरम्यान त्यांनी नाशिक येथेसहायक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

  गेल्या तीन वर्षांत राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण आणि लोककल्याणकारी योजना, विविध विकासात्मक उपक्रम राबविताना येथील अधिकारी व जनतेने सहकार्य केल्याचे सचिन कुर्वे यांनी यावेळी सांगितले. 2003 च्या बॅचचे आयएएस असलेले श्री. कुर्वे यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. ते 25 मे 2015 रोजी नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145