Published On : Thu, Mar 4th, 2021

अशोक मेंढे यांचा सत्कार

भाजपा राष्ट्रीय अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्षपदी नियुक्तीबद्दल ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केले अभिनंदन

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्षपदी अशोक मेंढे यांची नियुक्ती झाली.

त्यांच्यानियुक्तीबद्दल भाजपा प्रदेश सचिव व पॅनलिस्ट ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पुष्पगुच्छ देऊन अशोक मेंढे यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्यासह शहर सचिव ॲड. राहुल झांबरे, ॲड. नरेंद्र गोंडाणे, धनंजय कांबळे, रोशन बारमासे आदी पदाधिकारी उपस्थित होते.