Published On : Thu, Mar 4th, 2021

प्रभाग २६मध्ये पाणी पुरवठा सुरळीत करा नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांची अधिका-यांसोबत बैठक

Advertisement

नागपूर : नागपूर शहरातील प्रभाग २६मधील विविध भागांमध्ये पाणी पुरवठ्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी असून या तक्रारी तातडीने सोडवून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी सूचना प्रभाग २६चे नगरसेवक ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केली.

प्रभाग २६च्या पाणी प्रश्नासंदर्भात त्यांनी जलप्रदाय विभाग व ओसीडब्ल्यूच्या अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी ओसीडब्ल्यूचे डेलिगेट अजय घरजळे, ओसीडब्ल्यूचे झोनल प्रमुख श्री ठाकूर, श्री सांबारे, प्रभाग अध्यक्ष राजेश संगेवार, सुरेश बारई आदी उपस्थित होते.

प्रभाग २६ अंतर्गत धरती मॉ नगर, विश्वशांती नगर, पवनशक्ती नगर, साहील नगर, अंतुजी नगर, अब्बुमीया नगर, न्यू सुरज नगर, तुलसी नगर आदी वस्त्यांमध्ये नियमित पाणी पोहचविण्याची कार्यवाही करणे, ज्या ठिकाणी नेटवर्क नाही अशा ठिकाणी टॅंकरच्या फे-या वाढविणे, धरती मॉ-श्रावण नगर येथील लाईनची टेस्टींग घेणे यासह ग्राहकांना लवकरात लवकर डिमांड पोहोचविण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश नगरसेवक ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी बैठकीत दिले.