नागपूर: विधानसभा निवडणुकीसाठी 13 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत.सर्व राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी यादरम्यान कुठे सभा घेण्यात आल्या.तर कुठे बाईक रॅली आणि पदयात्रा काढल्या. तरअनेक नेत्यांनी आपल्या होमग्राऊंडवर सभा गाजवल्या. सोमवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराचा शेवट झाला. महाराष्ट्राच्या सत्तेची चावी कुणाच्या हाती याचा निर्णय 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. नियमानुसार आता प्रचार संपला असून यापुढे दोन दिवस छुपा प्रचार सुरू राहणार आहे.
यादरम्यान नागपुरात प्रचार तोफा थंडावताच मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘चुहा मीटिंग्ज’च्या राजकारणाला सुरुवात होईल.
‘चूहा मीटिंग’ म्हणजे काय? निवडणुकीचा प्रचार संपला की सुरू होते छुपे राजकारण, रात्री उशिरा मेळावे यालाच’चुहा मीटिंग्ज’ असे म्हणतात. याअंतर्गत मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही गुप्त सत्रे आयोजित केली जातात. अनेकदा हाऊसिंग सोसायट्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये आयोजित केलेल्या बैठकांमधून मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैसे आणि दारूचा वापर केला जातो. मतदानाच्या दिवसासाठी रणनीती आखणे आणि मते सुरक्षित करणे हे या बैठकांचे उद्दिष्ट आहे.
‘नागपूर टुडे’ तुम्हाला अशा सभांच्या मोहात न पडता योग्य उमेदवारावर लक्ष केंद्रित करून हुशारीने आणि जबाबदारीने मतदान करण्याचे आवाहन करते. दरम्यान राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. याकरिता 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल समोर येणार आहे.