Published On : Fri, May 1st, 2020

कलाकार, लोककलावंत, कारागीर तत्सम गरजुना आर्थिक मदत द्यावी.

मुख्यमंत्री ना ईमेल व्दारे विजय हटवार यांची मागणी.

कन्हान : – कोरोना विषाणुचा प्रादुभाव रोखण्याकरिता संपुर्ण महाराष्ट्रात टाळेबं दी, संचारबंदीमुळे कार्यक्रम, समारंभ बंद केल्याने कलाकार, लोककलावंत, कारा गीर तत्सम गरजु वर्गावर बिकट आर्थिक संकट ओढावल्याने शासना व्दारे हयांना उदनिर्वाहाकरिता सरकारी धान्य व प्रति माह ५ हजार रूपये आर्थिक मदत त्वरि त द्यावी. ही मागणी मुख्यमंत्री मा उध्दव ठाकरे साहेबाना ईमेल व्दारे विजय हटवार यानी केली आहे.

Advertisement

संपुर्ण देशात व महाराष्ट्रात कोरोना विषाणु (कोविड-१९) च्या महामारीचा प्रादुभाव रोखण्याकरिता २४ मार्च पासुन २१ दिवस व वाढवुन १९ दिवसाची टाळे बंदी व संचारबंदीने सर्व कार्यक्रम व समा रंभ बंद असल्याने रोजगार हिराऊन आ पल्या कला कौशलेच्या माध्यमाने उदर्नि वाह करणा-यांचे एका महिन्यात अंत्यत दयनिय परिस्थीती होऊन आर्थिक संकट बळावुन उपासमारीची पाळी येऊ पाहत असल्याने राज्य व विदर्भातील सर्व ऑर केस्ट्रा, सुगम संगीत, कलाकार, नाटयक ला, लोककलावंत तसेच सांऊड, लाईट, इलेक्ट्रीशन, प्लबंर, नाभिक कारागीर इत र तत्सम वर्ग मोठया प्रमाणात गणपती, दुर्गा, दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन, दिवा ळी, मंडई सणउत्सव, जिजाऊ, सावित्री, शिवाजी, आंबेडकर, बुध्द जयंती तसेच लग्न समारंभ, कार्यक्रमात आपल्या क ला कौशल्याच्या माध्यमातुन उपजिविके ची सोय करित असतात. कोरोनाच्या संकटाने आदीची अत्यंत नाजुक अवस्थे त जगत असुन त्यांचेवर बिकट आर्थिक संकटाचे सावट ओढावल्याने परिवारावर उपासमारीची पाळी उदभवणार आहे. कारण बहुतेका कडे राहायला घर नाही, शिधापत्रिका नसुन खायला अन्न धान्य नाही. हा एक महिना काटकसरीत उधार वाडीने निघाला परंतु दिवसेदिवस यांची परिस्थीती ढासळत आहे. हे असंघटीत क्षेत्रात येत असल्याने कोणती ही योजना लागु नाही.

सामोर यांचेवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणुन आपण कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा उध्दवजी ठाकरे साहेब या कलाकार व कलावंताच्या जिवन जग ण्यांचे गांर्भीय लक्षात घेऊन सर्व लोकक लावंत, कलाकार, कारागीर तत्सम गरवं त वर्गाचे आर्थिक संकट दुर करण्यास शासना व्दारे मासिक मानधन, हक्काचे घर, पेशन व विमा लाभ योजनेत समावि ष्ट करण्यात यावे. सध्या यांना उदनिर्वाह करण्याकरिता सरकारी धान्य व प्रतिमाह पाच हजार रूपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मा विजय हटवार उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तथा माजी सदस्य भारतीय खादय निगम भारत सरकार हयानी ईमेल करून केली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement