Advertisement
नागपूर : शिवसेनापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राजकीय वर्तुळात सक्रिय झाले आहे. यापार्श्वभूमीवर ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. विदर्भातून त्यांनी आज दौऱ्याला सुरुवात केली.
ठाकरे यांचे रविवारी सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. तेव्हा शिवसैनिकांनी त्यांचे दणक्यात स्वागत केले. जय शिवाजी, जय भवानी, आवाज कुणाचा – शिवसेनेचा या घोषणाबाजीने विमानतळ परिसर दणाणला होता. नागपूरहून उद्धव ठाकरे यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवीकडे रवाना झाले. सोमवारी त्यांचा नागपुरात पक्ष मेळावा असून ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील.