Published On : Sat, Jul 8th, 2023
By Nagpur Today Nagpur News

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची शिवसेनेच्या सर्व आमदारांना नोटीस, अपात्रतेचा निर्णय लागणार?

Advertisement

मुंबई :केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेची प्रत विधानसभा अध्यक्षांना पाठवल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्रतेविषयी र नोटीस जारी केली आहे. दोन्ही पक्षांच्या आमदारांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १४ आमदारांना ही नोटीस जारी केली आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर सोपवली आहे. आपण शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करुन यावर निर्णय घेऊ असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं. त्यानुसार त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने ही प्रत त्यां ओमना पाठवली आहे. यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना नोटीस जारी केली.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून एकमेकांच्या आमदारांच्या पात्रतेवर आक्षेप घेण्यात आला आहे. यावेळी आमदारांना पुराव्यांसह प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Advertisement