Published On : Mon, Jul 10th, 2023
By Nagpur Today Nagpur News

पंतप्रधान मोदींची कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाकडून सोशल मिडियातील प्रभावशाली व्यक्तींचे संमेलन !

Advertisement

गडचिरोली : भाजपाकडून मोदी @ 9 या महाजनसंपर्क अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या कार्यकाळातील कामे जनतेपर्यंत पोहचविण्याकरीता भाजपाकडून सोशल मिडियातील प्रभावशाली व्यक्तींचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातील सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर (प्रभावशाली व्यक्ती) संमेलन येथील प्रेस क्लब भवनात रविवारी पार पडले.

या बैठकीचे उद्घाटक म्हणून खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते होते. मिडिया प्रमुखांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, सोशल मिडिया एक विशाल नेटवर्क असून कोणत्याही मुद्द्याला उचलून धरण्यासाठी व्हॅाट्सअ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे प्रभावी माध्यम आहेत.त्यामुळे येत्या काळात होणारे कार्यक्रम आणि झालेले कार्यक्रम सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी जागरूक असावे. व्हॅाट्स अ‍ॅपद्वारे जर कोणी व्यक्ती आपल्या शासनाच्या विरोधात कॉमेंट करत असेल तर त्या कॅामेंटला उत्तर देण्याचे काम सोशल मिडियाच्या माध्यमातून लगेच केले पाहिजे.केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यातही सोशल मिडियाची महत्वाची भूमिका बजावत असल्याचेही खासदार नेते म्हणाले.

Gold Rate
23 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,36,300/-
Gold 22 KT ₹ 1,26,800/-
Silver/Kg ₹ 2,10,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत ९ वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला. अर्थव्यवस्थेमध्ये आपला भारत देश आधी जगात अकराव्या स्थानी होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तो पाचव्या स्थानी पोहोचला आहे. देशाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. सर्वसामान्य जनतेसाठी मोदी यांनी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. त्या जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहेत. या सर्व चांगल्या गोष्टी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सोशल मिडियाच्या माध्यमातून पोहोचवण्याचे काम सर्वांनी करावे, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर (प्रभावशाली व्यक्ती) यांना केले.

या कार्यक्रमात मंचावर आमदार डॉ.देवराव होळी, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, भाजपा सोशल मीडियाचे प्रदेश संयोजक प्रकाश गाडे, सहसंयोजक लक्की चावला, प्रदेश सदस्य तथा चंद्रपूर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम, प्रदेश चिटणीस रेखा डोळस, माजी.जि.प.सदस्य तथा धानोरा तालुकाध्यक्ष लता पुंगाटी, सोशल मिडिया प्रमुख तथा कार्यक्रमाचे आयोजक आनंद खजांजी, खासदारांचे सोशल मिडिया प्रमुख दिवाकर गेडाम, मिडिया प्रमुख रमेश अधिकारी तसेच मोठ्या संख्येने लोकसभा क्षेत्रातील सोशल मिडिया हाताळणारे युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement