Published On : Tue, Jul 21st, 2020

वाघ नर (NT-1) चे गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात आगमन

नागपूर: ब्रम्हपुरी वनविभागातील नागभीड / तळोधीवनपरिक्षेत्र अंतर्गत मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या वाघ नर (NT-1) यास दिनांक १९.०७.२०२० रोजी जेरबंद करण्यात आले. सदर वाघ नर (NT-1) चे मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), म.रा., नागपूर यांचे आदेशान्वये सदर वाघ नर (NT-1) ची रवानगी गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्र, नागपूर येथे करण्यात आली आहे.

त्यानुसार जेरबंद केलेल्या सदर वाघ नर (NT-1) ला कु. ए. एच. सोनटक्के, वनक्षेत्रपाल (प्रा.), तळोधीव डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी,RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांच्या समवेत गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात आज दिनांक २०.०७.२०२० रोजीसकाळी१०:१५ वाजता आगमन झाले.

डॉ. भाग्यश्री भदाणे,डॉ. सुजित कोलंगथ, डॉ. शालिनी ए. एस. व डॉ. मयूर पावशे यांनी वाघ नर (NT-1) ची प्राथमिक तपासणी केली असता असे निदर्शनास आले कि सदर वाघ नर (NT-1) सजग, शारीरिक स्थिती चांगली आणि निरोगी दिसून येते. सदर वाघ नर (NT-1) लाउपचार पिंजऱ्यात घेऊन ओळखीसाठी मायक्रोचिप लावण्यात आली. सदर वाघ नर (NT-1) चे रक्त व रक्तजल नमुने तातडीने तपासण्यात आले व Quarantine मध्ये डॉ. शिरीष उपाध्ये व वन्यप्राणी संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या चमूच्या पाहणीत ठेवण्यात आले आहे.

याप्रसंगी सर्वश्री सहाय्यक वनसंरक्षक, गोरेवाडा प्रकल्प एच. व्ही. माडभुषी, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. पी. भिवगडे तसेच आर. डी. वलथरे, हरीश किनकर,आर. एच. वाघाडे, वनरक्षक व सौ. पी. सी. पाटराबे, वनरक्षक (सर्व) वन्यप्राणी बचाव केंद्र, गोरेवाडा प्रकल्प, नागपूरहे उपस्थित होते.