Published On : Thu, Sep 10th, 2020

त्या समाजकंटकांना तातडीने अटक करा : चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

नागरिकांनी शांतता राखावी आवाहन

नागपूर: मौदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्थापित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची कोणीतरी अज्ञात समाज कंटकाने विटंबना केली आहे. या गंभीर आणि संतापजनक प्रकाराबाबत पोलीस स्टेशन मौदा येथे तक्रार केली आहे.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हे समाजात तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने योग्य ती दखल घेऊन दोषींवर कारवाई क़रावी, अशी मागणीवजा विनंती भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी पालकमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

या प्रकरणी नागरिकांनी शांतता राखावी असे नम्र आवाहनही बावनकुळे यांनी केले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न करावे. समाजात भांडणे व्हावीत असेच षडयंत्र हे समाजकंटक रचत असतात, आपण त्यांना बळी पडू नये. पोलिसांनी या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींना तातडीने अटक करावी, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Advertisement
Advertisement