Published On : Wed, Sep 30th, 2020

सराईत गुन्हेगारास 1 किलो गांजासह अटक

कामठी :-विविध गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार हा गांजा बाळगत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून दुपारी 1.40 वाजता रेल्वे स्टेशन रोड वरील जय भोले रेस्टरेंट समोर सदर सराईत गुन्हेगाराची झडती घेतली असता यांच्याकडे 1 किलो गांजा किमती 10 हजार रुपयांचा अंमली पदार्थ आढळला असून सदर अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी नेत असल्याचे सांगण्यात येते.पोलिसांनी सदर आरोपीस अटक करून याच्याकडील 10 हजार रुपये किमतीचा अवैध गांजा जप्त करण्यात आला असून अटक आरोपी चे नाव जब्बार उर्फ डुंड्या रहीम खान वय 35 वर्षे रा बस स्टँड झोपडपट्टी कामठी असे आहे.

ही यशस्वी कारवाही नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल, गुन्हे पोलीस निरीक्षक आर आर पाल यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक विनोद धोंगडे, पोलीस हवा राजेश साखरे, सतीश मोहाडे, कृष्णा दाभणे, निलेश यादव, ललित शेंडे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी