Published On : Thu, Sep 26th, 2019

मनपाच्या ३२ प्रा.आ.केंद्रातून ई-कार्ड वितरणाची व्यवस्था

Advertisement

३२ हजारांवर लाभार्थ्यांना कार्ड वाटप


नागपूर : आरोग्य सेवेचा लाभ गरीब रुग्णांना मिळण्याकरिता आणि आपत्तीजनक आरोग्यासाठीच्या खर्चापासून लोकांना संरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई-कार्ड वितरणाची व्यवस्था मनपाच्या ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि हेल्थ पोस्टमध्ये नि:शुल्क करण्यात आली आहे.

ई-कार्ड वाटप १२३ सिटीझन सर्व्हिस सेंटरमार्फत सुरू आहे. यासाठी प्रति व्यक्ती ३० रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, नागपूर महानगरपालिकेने सुरू केलेल्या ई-कार्ड वितरणासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नसल्याची माहिती मनपाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांनी दिली. लाभार्थ्यांनी या लाभाकरिता पात्र आहे किंवा नाही याबाबतची माहिती जवळच्या आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेता येईल अथवा https://mera.pmjay.gov.in/serch/login या संकेतस्थळावर भेट देऊनही आपले नाव आहे किंवा नाही हे जाणून घेता येईल. १४५५५/१८००१११५६५ या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधून माहिती जाणून घेता येईल, असे डॉ. भावना सोनकुसळे यांनी सांगितले.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत नागपूर महानगर क्षेत्रात २३ खासगी व शासकीय रुग्णालये सेवा देणार असून यामध्ये १३०० आजारांकरिता पाच लाखा रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत सन २०११ च्या जातीनिहाय, सामाजिक, आर्थिक जनगणनेमधील काही निकषांवर आधारीत लाभार्थ्यांना दरवर्षी प्रती कुटुंबासाठी पाच लाखांपर्यंतचे आर्थिक कवच विमारूपाने उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नोंदणी व बेड शुल्क, नर्सिंग व बोर्डिंग शुल्क, सर्जन, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय आणि सल्लागार फी, रक्त संक्रमण, ऑपरेशन शुल्क, शस्त्रक्रिया उपकरणांची किंमत, औषधे, इम्प्लान्टस्‌, पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, एमआयआर, सिटीस्कॅन, सोनोग्राफी, डिस्चार्जनंतर १५ दिवसांपर्यंत चाचणी औषध आदींचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.

महानगरपालिकेअंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी एकूण पात्र लाभार्थी २,१९,७७० आहेत. त्यापैकी आजपर्यंत ४२५०६ लाभार्थ्यांचे ई-कार्ड तयार झालेले आहे. उर्वरितांनी त्वरित जवळच्या महानगरपालिका आरोग्य केंद्राशी संपर्क साधून आपले नाव तपासून घ्यावे. असल्यास राशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड किंवा कुठलेही शासकीय ओळखपत्र दाखवून ई-कार्ड तातडीने तयार करून घ्यावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement