Published On : Tue, Jul 2nd, 2019

नासुप्रच्या ११८७व्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांना मंजुरी

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास येथे विष्वस्त मंडळाची ११८७ वी सर्वसाधारण सभा ०१ जुलै २०१९ रोजी पार पडली. सदर स्थित नासुप्रच्या मुख्यालयात पार पडलेल्या या सभेत नामप्रविप्रा’चे महानगर आयुक्त व नासुप्रचे सभापती श्रीमती श्रीमती शीतल तेली-उगले, नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे, नासुप्रचे महाव्यवस्थापक लांडे, नासुप्रचे अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार व कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता(प्रकल्प) प्रशांत भांडारकर उपस्थित होते. या सभेत विश्वस्त मंडळाने विविध विषयांना मान्यता प्रदान केली. मंजुरी प्रदान करण्यात आलेले विषय पुढील प्रमाणे आहे.

मौजा भरतवाडा, पुनापूर, पारडी, भांडेवाडी येथे केेंद्र शासन पुरस्कृृत स्मार्ट सिटी प्रकल्पांर्गत १७३० एकर (७००.४० हेक्टर) क्षेत्रात नियोजन करण्यात आलेल्या नगर रचना परियोजना (टी.पी. स्कीम) अनुशंगाने नागपूर शहराच्या सन-२००१ च्या मंजूर विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७(२) अन्वये शासनाची मंजुरी प्राप्त झाले असून या नगररचना परियोजनेच्या (टी.पी. स्कीम) ला ‘‘नियोजन प्राधिकरण’’ म्हणून नागपूर महानगरपालिकेला घोशित करण्याबाबत.

विश्वस्त मंडळाचा निर्णय:- मनपा’तर्फे स्मार्ट सिटीचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. तथापि स्मार्ट सिटीच्या कार्यक्षेत्राकरीता नियोजन प्राधिकरण नासुप्रकडे असल्यामुळे त्यांना वेळोवेळी नासुप्र’ची टाऊनशिप विकास करण्याकरिता मान्यता घ्यावी लागत होती. यामुळे प्रकल्प राबविण्यात अडथळा येत होता. विश्वस्त मंडळाने ठराव मंजूर करून स्मार्ट सिटी प्रकल्पाकरिता आता मनपाच नियोजन प्राधिकरण राहील. सदर ठरावाला शासनाद्वारे मान्यता प्राप्त झाल्यानंतर स्मार्ट सिटीकरिता नियोजन प्राधिकरण म्हणून मनपा राहील.

नासुप्रच्या नाॅर्थ अंबाझरी मार्गावरील २.९४ एकर सार्वजनिक उपयोगाच्या जागेचे वाटप महाराष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशनला करण्याबाबत.

विश्वस्त मंडळाचा निर्णय:- श्रीराम एज्युकेशन सोसायटीला नासुप्रद्वारे २.९४ एकर जागा दिली होती. तथापी २.४४ एकर जागेचा ताबा श्रीराम एज्युकेशन सोसायटीकडून नासुप्रने परत घेतला. उर्वरित अर्धा एकर जागेचा ताबा श्रीराम एज्युकेशन सोसायटीकडे असल्यामुळे सदर मालमत्ता महाराष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशनला हस्तांतरित करण्यात अडथळा येत होता. याबाबत श्रीराम एज्युकेशन सोसायटीने सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव पिटिशन दाखल केले असून या न्यायालयीन प्रकरणात २८ एप्रिल २०१७ च्या आदेशानव्ये या जागेची आवश्यकता महाराष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशनला असल्यामुळे संबंधित पक्षकारांनी आपसी सहमतीने तोडगा काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर आपसी समझोता होऊन श्रीराम एज्युकेशन सोसायटीने याचिका मागे घेतली. नासुप्रने या अर्धा एकर जागेवरील शाळेच्या इमारतीचे बांधकाम तोडून संपूर्ण भूखंड मोकळा केला. विश्वस्त मंडळाने वरील बाबींचा विचार केला आणि ठरविले कि २.९४ एकर जागेचा ताबा महाराष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशनला देण्यात यावे.

झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टे/रजिस्ट्री करून देण्यासंदर्भाने दि. १७ नोव्हेंबर २०१८ रोजीचे शासन निर्णयाची अमलबजावणी करण्याबाबत.

विश्वस्त मंडळाचा निर्णय:- शासनाच्या झोपडपट्टी पट्टे वाटपाच्या निर्णयानुसार ५०० चौ.फूट पेक्षा अधिक परंतु १००० चौ.फूट पेक्षा कमी रहिवासी उपयोगात असलेल्यांसाठी ५० टक्के व वाणिज्यक उपयोग असल्यास १०० टक्के अधिमूल्य आकारण्याचे प्रावधान आहे. तथापी मनपाद्वारे झोपडपट्टी पट्टे धारकांकडून सदर बाबींकरीता शासनाचा निर्णयानुसार प्रदान केलेल्या अधिकारानुसा १० टक्के अधिमूल्य आकारण्यात येतात. मनपा व नासुप्र’च्या अधिमूल्य दरामध्ये तफावत असल्यामुळे विश्वस्त मंडळाने निर्णय घेतला कि मनपा प्रमाणेच झोपडपट्टी वासियांना पट्टे देताना ५०० ते १००० चौ.फूट करीत प्रचलित शिग्रसिद्ध गणकाच्या रहिवासी उपयोगाकरिता १० टक्के व वाणिज्यक उपयोगाकरिता २५ टक्के अधिमूल्य आकारण्यात यावे तसेच ५०० चौ.फुटावर वाणिज्यक उपयोग असल्यास त्यांच्याकडून १०० टक्के अधिभार आकारण्यात यावे. शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी नासुप्रद्वारे करण्यात यावी.

नागपूर सुधार प्रन्यास अधिनियम १९३६ च्या कलम ५७ अंतर्गत नागपूर सुधार प्रन्यासच्या मालकीच्या तसेच गुंठेवारी कायद्याअंतर्गत नियमित विविध अभिन्यासातील व खाजगी मंजूर अभिन्यासातील मोकळया जागा नागपूर महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्याबाबत.

विश्वस्त मंडळाचा निर्णय:- मनपाद्वारे वेळोवेळी जलकुंभाची बांधणी करण्याकरता तसेच काही खेळाचे मैदाने विकसित करण्याकरिता मागणी करण्यात येते. याअनुषंगाने नासुप्र’च्या मालकीच्या एकूण ३७ मोकळ्या जागा नासुप्र अधिनियम १९३६ च्या कलाम ५७ अंतर्गत मनपाकडे हस्तांतरित करण्याबाबत विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली. यामुळे मनपाला सदर खेळाचे मैदानांचे विकास करण्यास मदत होईल.

नासुप्रद्वारा वाटप केलेल्या भूखंडावर वाटपधारी तथा डेव्हलपर्स द्वारा बांधकाम केलेल्या गाळयाचे/दुकानाचे पट्टा नुतनीकरण अविभक्त जमीन हिस्सासह करण्याबाबत.

विश्वस्त मंडळाचा निर्णय:– नासुप्र’च्या वैयक्तिक भूखंडधारकांना वेळोवेळी भूखंडाचे वाटप करण्यात आलेले आहे. तथापी सदर भूखंडकावर सदनिका तयार झालेले असून या भूखंडकावर सध्या बहुमजली इमारती तयार झालेले आहे. या इमारतीचे एकापेक्षा ज्यास्त भूखंड मालक झालेले आहेत. नासुप्रद्वाद्वारे वाटप केलेल्या भुखंडाचे वाटपधारी तथा विकासकाद्वारा बांधण्यात आलेल्या गाळया/दुकानाचे १०० टक्के नामांतरण होत नसल्यामुळे इतर गाळे धारकांना भुखडकाचे नुतणीकरण करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असल्यामुळे अशा गाळे धारकांना गाळयांचा हिस्सा, जमीनीच्या अविभक्त हिस्याच्या किमान ५१ टक्के होत असल्यास, वाटप पत्रातील शर्ती व अटी नुसार अविभक्त हिस्स्याचे संयुक्तरीत्या डीओडी नुसार पट्टा पंजियन/पट्टा-नुतनीकरण करण्याची कार्यवाही भूखंडकाचा संपुर्ण भुभाटक भरण्याच्या अटीवर विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली.