नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व एकता गणेश उत्सव मंडळाचे मुख्य संयोजक आमदार प्रकाश गजभिये यांच्या पुढाकाराने हिलटॉपचा राजा “डॉक्टर श्री गणेश” यांचे चितारओळी, महाल येथुन “कोरोना केअर हॉस्पिटल 2020” हिलटॉप येथे आगमन झाले.
यावेळी शोभायात्रेत महाराष्ट्र पोलीस डॉक्टर, नर्स व कोरोणा पेशंट यांच्या आकर्षक मुर्त्या सर्वांचे लक्ष आकर्षित करत होते तर विविध वेशभूषा सोबतच पोलीस, डॉक्टर, नर्स यांच्या गणवेशात सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत मास्कचा उपयोग करीत कलावंतही मिरवणुकीत उपस्थित होते.
Advertisement









