वाडी : नागपूर (ग्रामीण) तालुक्याचे नवीन तहसीलदार म्हणून अरविंद हिंगे यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यानिमित्त तहसील कार्यालयात स्वागत व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हिंगे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र भाजप सोशल मीडिया राज्य सहसमन्वयक सरदार लकी सिंग चावला, माजी विदर्भ आयटी समन्वयक अभिजित जोशी, नागपूर जिल्हा ग्रामीण सोशल मीडिया समन्वयक राकेश आसाटी यांच्यासह अनेकांनी तहसीलदार अरविंद हिंगे यांचे अभिनंदन केले.
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना अरविंद हिंगे यांनी शासनाच्या धोरणांची पारदर्शक व प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविणे, सुशासनाला प्राधान्य देणे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय राखून प्रभावी प्रशासन उभारण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





