Published On : Thu, May 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात चालानाच्या कारवाईचा राग; महिला वाहतूक पोलिसावर बोरी फेकून हल्ला

Advertisement

nagpur traffic police attack

नागपूर : शहरातील गजबजलेल्या शताब्दी चौकात वाहतूक नियमभंगावर कारवाई करत असताना एका संतप्त तरुणाने महिला वाहतूक पोलिसावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

माहितीनुसार, अजनी वाहतूक विभागातील महिला हवालदार मालती आत्माराम पाल (५६) या सहकाऱ्यासह शताब्दी चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करत होत्या. त्यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वार इंजमामुल कलीम खान (३३, रा. सुंदरनगर, खरबी) याला थांबवून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कारवाई सुरू होताच संबंधित तरुण संतापला. त्याने महिला पोलिसांसोबत वाद घालत शिवीगाळ केली तसेच धमकी देण्यास सुरुवात केली. परिस्थिती अधिक चिघळल्यानंतर आरोपीने जवळ पडलेली बोरी उचलून थेट महिला हवालदारांच्या डोक्यावर फेकली.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे चौकात एकच गोंधळ उडाला. उपस्थित नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आरोपीने महिला पोलिसांच्या सहकाऱ्याशीही अरेरावी केल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, धमकी देणे आणि हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

महिला पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरभरदिवसा ड्युटीवर असलेल्या महिला वाहतूक पोलिसावर झालेल्या या हल्ल्यामुळे शहरातील पोलिसांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges