Published On : Tue, Mar 3rd, 2020

जुन्या पेन्शनकरिता अभाप्राथशि सं. चे दिल्लीला साखळी धरणे आंदोलन

कन्हान : – सन २००५ नंतर नियुक्ती झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.रामपाल सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली जंतर-मंतर नवी दिल्लीला जोरदार शक्ती प्रदर्शन करीत भव्य साखळी धरणे आंदो लन करण्यात आले. हे साखळी धरणे आंदोलन २१ ते २७ फेब्रूवारी २०२० पर्यंत करण्यात आले. देशातील विविध राज्यातील शिक्षक या आंदोलनात सह भागी झाले होते. नागपूर जिल्ह्यातील९० शिक्षकांसह महाराष्ट्र राज्यातील सुमारे २००० पेक्षा अधिक शिक्षकांनी या आंदो लनात सहभाग नोंदविला.

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने सन २००५नंतर नियुक्ती झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह १०, २०, ३० वर्षांनी मिळणारी आश्वासित प्रगती योजना इतर कर्मचाऱ्यां प्रमाणे शिक्षकां नाही लागू करावी. शिल्लक रजेचे रोखी करण करण्यात यावे, ऑनलाईन कामां साठी स्वतंत्र यंत्रणा स्थापित करावी. शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेमचा लाभ द्यावा. समान काम समान वेतन या तत्वा नुसार पदवीधर विषय शिक्षकांना नियमि त पदवीधर वेतन श्रेणी देण्यात यावी. सहाव्या वेतन आयोगातील त्रूटी दूर करू न त्याचा लाभ ०१/०१/२००६ पासून देण्यात यावा. शिक्षकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी शिक्षण आयोगाची स्थापना करावी. शिक्षण सेवक पद्धत बंद करून नियमित शिक्षकांची नेमणूक करावी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिक्षक विरोधी अटी काढून टाकण्यात याव्यात. बदल्यांच्या धोरणात सुधारणा करावी. पटसंख्ये अभावी कोणतीही शाळा बंद करण्यात येऊ नये.सर्व अशैक्ष णिक कामे बंद करण्यात यावीत.

शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणे मार्फ त राबविण्यात यावी. शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदे शिक्षकांमधून बढतीने भरण्यात यावीत इ. शिक्षकांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी गेली ३ वर्षे जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरा वर विविध आंदोलने केली. मात्र शिक्षकां च्या कोणत्याही मागण्या शासनाने मान्य केल्या नाहीत. शासनाला जाग आणण्या साठी देशातील कानाकोपऱ्यात आंदोल न करण्याचे ठरवून आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात २१ डिसेंबर २०१९ रोजी जिल्हा मुख्यालयी धरणे आंदोलन करून निवेद ने देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात २१ जानेवारी २०२० रोजी प्रत्येक राज्याच्या मुख्यालयी आंदोलने करून निवेदन देण्यात आले. तर अंतिम टप्प्यात दिल्ली येथील जंतर-मंतर या ठिकाणी दि. २१ ते २७ फेब्रूवारी २०२०अखेर जोरदार शक्ती प्रदर्शन करीत साखळी धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाने शासना स जाग न आल्यास व शिक्षकांच्या प्रलं बित मागण्या न झाल्यास, अंतिम निर्णाय क टप्प्यात येत्या गांधी जयंती दिनी (२ ऑक्टोबर २०२०) रोजी हजारो शिक्षक राजघाटावरून मोर्चा काढून संसदेला घेराव घालून जेलभरो आंदोलन करतील असा इशारा राष्ट्रीयअध्यक्ष रामपाल सिंग यांनी शासनास दिला आहे. या साखळी धरणे आंदोलनात अखिल महाराष्ट्र प्राथ मिक शिक्षक संघ जिल्हा नागपूर शिक्षक नेते गोपाल चरडे, रामुजी गोतमारे,सुनिल पेटकर,सुभाष गायधने, जिल्हाध्यक्ष धनराज बोडे, सरचिटणीस विरेंद्र वाघमा रे, उपाध्यक्ष निलेश राठोड, कोषाध्यक्ष पंजाब राठोड, उपसरचिटणीस उज्वल रोकडे, महिला सेल अध्यक्ष आशा झिल्पे , सचिव सिंधू टिपरे यासह अनेक पदाधि कारी सहभागी झाले होते.