Published On : Sat, Jul 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५७९ उमेदवारांना दिले जाणार नियुक्ती पत्र महापौर श्रीमती निता ठाकरे यांची पत्रपरिषदेत माहिती

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील 476 सफाई कामगारांना राज्य सरकारच्या मदतीने कायम नियुक्तीच्या पत्रांचे वाटप केले जाणार आहे. याशिवाय सरळ सेवा भरतीतील 103 असे एकूण ५७९ उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले जाणार आहे. याशिवाय मनपाच्या परिवहन विभागाने प्रवाश्यांच्या सुविधेसाठी विकसित केलेल्या व्हाॅट्स अॅप टिकिटिंग प्रणालीचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते व केंद्रीय मंत्री माननीय श्री. नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मनपाच्या हिरवळीवर रविवार ता.26 जुलै रोजी दुपारी ४.३० वाजता होणार असल्याची माहिती मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी आज (ता.24) पत्रपरिषदेत दिली.

यावेळी पत्रपरिषदेत उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवाणी दाणी-वखरे, परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे, उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री. राजेश भगत, श्री. गणेश राठोड उपस्थित होते.

Gold Rate
Sept 09,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,35,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे म्हणाल्या की, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कामगारांची मोठी भूमिका असते. ते रात्रंदिवस शहर स्वच्छ करण्यासाठी सतत तयार असतात. त्यांच्या नोकरीमध्ये स्थायित्व यावे, या उद्देशाने लाड-पागे समितीने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिल्यामुळे सफाई कामगारांसाठी हा विशेष दिवस राहणार आहे. अनेक दिवसांपासून रेंगाळलेल्या या मागणीची पूर्तता होताना आनंद होत आहे. रविवारी होणाऱ्या कार्यक्रमात शहरातील 476 सफाई कामगारांना कायम नियुक्तीचे पत्रांचे वितरण केले जाणार आहे. यात 202 महिला तर 273 पुरुष सफाई कामगारांचा समावेश आहे. यात लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार तसेच अधिसंख्य सफाई कामगारांचा समावेश आहे. याशिवाय मनपाच्या सरळ सेवा भरतीतील 103 उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले जाणार आहे. शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रात सफाई कामगारांसाठी घरे तयार करण्याचा मानस महापौर यांनी व्यक्त केला.

यावेळी परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे यांनी मनपाच्या परिवहन विभागाने आपली बस सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी व्हॉटस्ॲप टिकिटिंग सेवा चे लोकार्पण यावेळी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बस बद्दल सर्व माहिती या व्हॉटसॲपच्या माध्यमातून नागरिकांना माहिती मिळेल आणि सर्वांना माध्यमातून आपली बसचे तिकीट ऑनलाईन पद्धतीने घेता येणार आहे. बसमध्ये क्यू आर कोड राहील. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर व्हॉटसॲप आपोआप सुरू होईल. यानंतर बाय तिकीटचा पर्याय समोर येईल. यानंतर प्रवाशाला सुरूवातीचे स्थान तसेच गंतव्य स्थान म्हणजे डेस्टीनेशन पर्याय निवडावा लागेल. यानंतर ऑनलाईन पेमेंटचा पर्याय पूर्ण करावा लागेल. ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर प्रवाशाच्या मोबाईलमध्ये डीजीटल तिकीट प्राप्त होईल. पर्यावरण पूरक ही पद्धत असल्याने कागदाचा खर्च सुद्धा वाचणार आहे. एक प्रकारे पर्यावरणासाठी पूरक अशी ही प्रक्रिया असल्याची अशी माहिती त्यांनी दिली.

Advertisement

यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. शहरात 5 लाख झाडांचे वृक्षारोपण केले जाणार आहे. यात 1 लाख झाडे रायसोनी ग्रुपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे. बदलते पर्यावरण व शहराचे हरीत आच्छादन वाढविण्यासाठी हा उपक्रम मनपाने हाती घेतला आहे. यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारने सुद्धा यासाठी रोपटे देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गोरेवाडा, नंदग्राम, मनपाच्या सर्व शाळा, भांडेवाडी डंपिंग यार्ड, खाजगी महाविद्यालय व इतर ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. वृक्षारोपणाकरिता गड्डे करण्याकरिता मशीनची मदत घेतली जाईल. ही मशीन मॉईलच्या सीएसआर निधीतून मिळणार असल्याची माहिती महापौर निता ठाकरे यांनी दिली. याशिवाय नागपूर शहरात लावण्यात येणाऱ्या प्रत्येक झाडांची Lat. Long. नुसार Geo-Tagging करण्यात येणार आहे. याकरीता एजेन्सी नेमण्यात येईल. याकरीता ह्यापूर्वी शहरातील सर्व शासकीय विभाग, शाळा, महाविद्यालयाचे प्रतिनिधी, NGO, गणेश मंडळ, दुर्गा मंडळ व धार्मिक संस्थाचे प्रतिनिधी यांची सभा कविवर्य सुरेश भट सभागृह येथे घेण्यात आली होती. यामध्ये विविध संस्थांनी मनपास वृक्ष, ट्री-गार्ड मोफत उपलब्ध करून देण्याची सहमती दिली, असुन ह्याबाबत झाड/वृक्षाची रोप उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही सुरु असून, दिनांक १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सदर वृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार आहे. नागपूर शहराला हिरवे करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या क्षमतेनुसार किमान एक झाड लावण्याचे कार्य करावे. असे आवाहन यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.