Published On : Wed, Sep 23rd, 2020

कृषी औजारे बँक अर्थसहायासाठी ऑनलाईन अर्ज करा

भंडारा : राज्यात सन 2014-15 पासून कृषि यांत्रीकिकरण उपअभियान राबविण्यात येत आहे. सदर योजनेमध्ये (घटक 3) कृषि औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य व (घटक 4) भाडे तत्वावर कृषि यांत्रीकिकरण सेवा-सुविधा केंद्र/कृषि औजारे बँक स्थापनेसाठी अर्थसहाय्य याकरिता राज्य शासनाने mahadbtmahait.gov.in हे पोर्टल कार्यान्वित झालेले असून शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही सूर झालेली आहे. कृषि यांत्रीकिकरण उपअभियान सन 2020-21 अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची पोर्टल वर नोंदणी व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती बाबतची माहिती “ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना” या सदराखालील देण्यात आलेली आहे.

ट्रॅक्टर बाबींकरिता शासन निर्णयाव्दारे घोषित केल्यानूसार अनू.जाती, अनू.जमाती, अल्प व अत्यल्प भुधारक आणि महीला शेतकरी यांना किमतीच्या 50 टक्के किंवा 1 लाख 25 हजार यापैकी जे कमी असेल ते अणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40 टक्के किंवा रूपये 1 लाख यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनूदान मर्यादा राहील. केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थांकडून तपासणी केलेल्या ट्रक्टर, पावरटिलर, तसेच इतर औजारांच्या बाबतीत केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेकडील वैध तपासणी अहवाल उपलब्ध असलेल्या औजारांनाच अनूदान अनुज्ञेय राहील.

Gold Rate
28 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,000 /-
Gold 22 KT ₹ 1,12,500 /-
Silver/Kg ₹ 1,46,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

mahadbtmahait.gov.in पोर्टलवर शेतऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करतांना शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आधार लिंक असणे अनिवार्य आहे तसेच अर्ज सादर करतांना आधारकार्ड, बँक पास बूक, 7/12, 8 अ, (अनू.जाती व अनू. जमाती प्रवर्गाकरिता जातीचा दाखला) सोबत असणे अनिवार्य आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

Advertisement
Advertisement