Published On : Wed, Jun 12th, 2019

ST प्रमाणे सवलतींचा GR तात्काळ लागू करा

Advertisement

– खासदार पद्मश्री डॉ. विकासजी महात्मे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकसभा निवडणुकीच्या वेळी धनगरांना ST प्रमाणे सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. मात्र आचारसंहिते मुळे GR काढता आला नाही. आता त्वरित GR काढावा आणि आगामी बजेट मध्ये 1200 कोटी निधीची तरतूद करून चालू शैक्षणिक सत्रापासूनच त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी घेऊन माननीय खासदार पद्मश्री विकासजी महात्मे यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच मा.वित्त मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची काल दि. 11.6.2019 मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. मा. मुख्यमंत्र्यांनी लगेच मुख्य सचिव, वित्त सचिव व इतर संबंधीत सचिवांसोबत बैठक घडवून आणली.

यावेळी धनगर समाजाच्या आर्थिक अडचणी बाबत व आदिवासी समाजाला दिल्या जाणाऱ्या सवलती – घरकुल, वसतीगृह,शिष्यवृत्ती,भूमीहीनांना जमीन, बार्टी सारखे प्रशिक्षण केंद्र,धनगर समाज उदयोजक,कौशल्य विकास निधी, मेंढपाळ धनगरांना चार महिन्यांसाठी चारा निधी – धनगर समाजाला सुद्धा देण्यात यावे याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी धनगर समाजाला निधी कसा उपलब्ध होईल.

याबाबत मुख्य सचिव श्री अजोय मेहता, वित्तसचिव, नियोजन विभागाचे सचिव श्री देवाशिष चक्रवर्ती, भटक्या व विमुक्त जमाती विभागाचे सचिव श्री जी पी गुप्ता यांच्याशी आदिवासींना मिळणाऱ्या सवलती प्रमाणे धनगर समाजाला सुद्धा सदर सवलती लागू व्हाव्यात याबाबत चर्चा विचारविनिमय केला व त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री व माननीय वित्तमंत्री यांनी आगामी अधिवेशनामध्ये अंदाजे रुपये 1200 कोटी मंजूर करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.

सदर बैठकीस माननीय खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यासोबत धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे जालना जिल्हाध्यक्ष श्री. कपिल दहेकर, श्री आनंद बनसोडे जिल्हाध्यक्ष धनगर संघर्ष समिती परभणी, श्री.मेघशाम करडे जिल्हाध्यक्ष धनगर संघर्ष समिती अमरावती, राज्य संघटक श्री संतोष महात्मे, व इतर उपस्थित होते.