Published On : Mon, May 21st, 2018

सैनिकांच्या मुलांसाठी वसतीगृह 30 जूनपर्यंत अर्ज करा

Hostel For Soldiers Children

File Pic

नागपूर: सैनिकांच्या मुलांना उच्च शिक्षण घेता यावे तसेच त्यांना निवासाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी नागपूर येथे माजी सैनिकी मुलांचे व मुलींचे वसतीगृहात प्रवेश देण्यात येते. मुलांच्या वसतीगृहात 51 तर मुलींसाठी 66 प्रवेश क्षमता असलेल्या सैनिकांसाठीच्या वसतीगृहात 30 जूनपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी केले आहे.

सिव्हील लाईन्स परिसरातील हिसलॉप कॉलेजजवळ माजी सैनिकी मुलांचे वसतीगृह आणि माजी सैनिकी मुलींचे वसतीगृह असून वसतीगृहात आजी व माजी सैनिक पाल्यांना सवलतीच्या दरात प्रवेश देण्यात येते. तसेच युध्द विधवांच्या आणि माजी सैनिकांच्या पाल्यांना मोफत निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध आहे.

जागा उपलब्ध असल्यास सर्व साधारण नागरिकांना येथे प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे. प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या सैनिकांच्या पाल्यांनी 30 जून पर्यंत प्रवेशासाठी अर्ज करावे. माजी सैनिक ओळखपत्र, गुणपत्रिका व शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्याचे संस्थेच्या दाखल्याचे छायांकित प्रतीसह माजी सैनिकी मुला, मुलींच्या वसतीगृहात सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी केले आहे.