Published On : Sat, Mar 7th, 2020

आपली बस च्या तिकीट निरीक्षकाचा पाठलाग करणाऱ्या चार आरोपीस अटक

Advertisement

कामठी :-नागपूर महानगरपालिका च्या वतीने सुरू असलेल्या आपली बस मध्ये काम करणारे तिकीट कंडकटर तिकीट चोरी करून महानगरपालिका सह शहर बस सेवेला आर्थिक नुकसान पोहोचवीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून तिकीट चेकर बस ची तपासणी करीत असताना कित्येकांना या तिकीट घोटाळा प्रकरणात पकडण्यात सुद्धा आले असून या तिकीट चेकर वर पाळत ठेवणारे गॅंग ही बस चेकिंग दरम्यान कामात अडथळा निर्माण करीत असल्याचा कारणावरून या डिम्स कंपनीचे तिकीट निरीक्षक नीलम प्रजापती ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून सहा आरोपी विरुद्ध भादवी कलम 341,120 (ब)2, 506 अनव्ये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आले होते

यातील चार आरोपीना आज अटक करण्यात आले असून अटक आरोपी मध्ये प्रेमशंकर मिश्रा वय 21 वर्षे रा गिट्टीखंदाण, कमलेश धोसेवार वय 30 वर्षे रा नन्दनवन, अभिजित गजभिये वय 25 वर्षे रा बिनाकी मंगळवारी, वैभव बोरकर वय 25 वर्षे रावर्धमान नगरनागपूर आहे.

Advertisement

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisementss
Advertisement
Advertisement
Advertisement