नागपूर: २१ व्या शतकाचे आवाहन स्वीकारुन भारताला एक प्रगत राष्ट्र म्हणून पुढे आणण्यासाठी दूरसंचार तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ज्यांचे कार्यकाळात भरीव कामगिरी करण्यात आली असे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांचा आज २१ मे हा स्मृतीदिन देशभर “दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस” म्हणून पाळण्यात येतो.
म.न.पा केन्द्रीय कार्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात स्व.राजीव गांधी यांच्या २७ व्या पुण्यतिथी निमित्त राजीवजींच्या तैलचित्राला उपमहापौर दिपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे व आयुक्त विरेन्द्र सिंह यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
यावेळी उपमहापौर दिपराज पार्डीकर यांनी उपस्थीत अधीकारी व कर्मचा-यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा दिली. समस्त मानव जातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणी सामंजस्य टिकविण्यासाठी व वर्धीष्णू करण्यासाठी यावेळी प्रतिज्ञा घेण्यात आली.
या प्रसंगी अपर आयुक्त रविंद्र कुंभारे, नगरसेवक जुल्फेकार भुट्टो, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, निगम सचिव हरिष दुबे, सहा. आयुक्त (सा.प्र.वि) महेश धामेचा, सहाय्यक आयुक्त मिलींद मेश्राम, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रमोद गावंडे, प्रमुख लेखा व वित्त अधीकारी मोना ठाकुर, कार्यकारी अभीयंता सर्वश्री संजय गायकवाड, नरेश बोरकर, डी.डी.जांभुळकर, राजेश भुतकर, प्रमुख अग्निशामक अधिकारी राजेन्द्र उचके, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, निगम अधीक्षक राजन काळे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेन्द्र टिंगणे, सहा.जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांचेसह अधिकारी – कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.
तत्पूर्वी दि. 21 मे रोजी सकाळी भारतरत्न राजीव गांधी पुण्यतिथी निमित्त उपमहापौर दिपराज पार्डीकर यांनी अजनी चौक वर्धा रोड स्थित राजीवजींच्या पुतळयाला नगरीच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, माजी आमदार दिनानाथ पडोळे, माजी नगरसेवक दिलीप पनकुळे व बहुसंख्येने नागरीक उपस्थित होते.