Advertisement
कन्हान : – प्रधानमंत्री उज्वला गँस योजना अन्तर्गत कोठारी ब्रदर कामठी व्दारे गोंडेगाव येथे पहिल्या टप्प्यात ३५ व दुसरा टप्यात ३५ सिलेंडर वाटप करण्यात आले.
गोंडेगाव येथे पंतप्रधान उज्वला गँस योजना अंतर्गत गावकरी महिलांना कोठारी ब्रदर कामठी व्दारे पहिल्या टप्प्यात ३५ व दुसऱ्या टप्प्यात ३५ गँस सिलेंडर चे माजी नगराध्यक्षा कन्हान अँड आशा ताई पनिकर, गोंडेगावचे सरपंच नितेश राऊत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले असुन रहिलेल्या महिलां ना सुध्दा गँस सिलेंडर लवकरच वाटप करण्यात येणार आहे.
याप्रसंगी उपसरपंच सुभाष डोकरीमारे, सामजिक कार्यकर्ता अमोल साकोरे, सदस्य सुनिल कुमार धुरिया, आकाश कोडवते, कुनाल मधुमटके, रेखा काळे सह गावातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.
Advertisement