Published On : Sat, Oct 14th, 2017

दीक्षाभूमि व संत ताजूद्दिन बाबा भूमिला संघ भूमी करण्याचा आणखी एक प्रयत्न : युवक कॉंग्रेस चा आरोप

दीक्षाभूमि व संत ताजूद्दिन बाबा भूमिला संघ भूमि करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व केंद्र सरकारने घाटच घातला आहे त्याचे उदारहण म्हणजे नागपुर ते थेट सरळ हज यात्रे साठी उड़ान होती नागपूर केंद्र बिंदु असून विदर्भातुन तसेच मध्यप्रदेश व छत्तीशगढ़ येथील हज यात्रे करुणां पवित्र हज यात्रा सोयची होती संघाच्या आग्रह मुळे हज यात्रा करुनवर हा धार्मिक आघात केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व केंद्र सरकार अल्पसंख्याक सोबत सावत्र वागणुक करीत आहे सरकार ऐसे काही निर्णय घेत आहे की इतिहासातून दीक्षाभूमि व संत ताजूद्दिन बाबा भूमि नाव त्यांना पुसून टाकायचे आहे.नागपूर ला इतिहास आहे सर्व जाती धर्म पंथाचे लोक गुणयागोविंदाने राहतात परम पूज्य भारत रत्न डॉ बाबा साहेब आंम्बेडकराची दीक्षाभूमि व संत ताजूद्दिन बाबा भूमि यांना संघ भूमिच करयाची आहे असे दिसते.

नागपूर हज उड़ान बंद करुन त्यांनी सिद्ध केले केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात हज हॉउस गंजीपेठ समोर नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके व नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेस अल्पसंख्यक सेलचे अध्यक्ष फैज़लुर रहमान कुरैशी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.मुख्य म्हणजे भाजपच्या मंत्री मंडळात मुख्तार अब्बास नकवी व शाहनवाज हुसैन हे दोन अल्पसंख्याक नेते मुग गिळुन बसले आहे संघ प्रमुखच केंद्र सरकार चालवत आहे.नुसते दलित व अल्पसंख्याक यांना वर वर दिखावु पणाची वागणूक देत आहे.प्रत्यक्षात मात्र या समाजाच्या विकासाची बाब येथे तेव्हा संघाचाच एजेंडा राबविला जातो।म्हणून आज मुख्तार अब्बास नकवी,शाहनवाज हुसैन,एम जे अकबर व मोहन भागवत यांच्या फोटोला काळे फासून त्यांचा निषेध केला प्रचंड प्रमाणात घोषणा बाजी व नारेनिर्दशने केली।बंटी शेळके यांनी आपल्या भाषनात म्हणाले की अल्पसंख्याक,दलित व हलवा बांधवांनी सावध राहावे।

भाजपाचे खायचे व दाखवाचे दात वेगवेगळे आहे हा पक्ष फक्त उच्चवर्णीयाचा पक्ष आहे.भाजपचा चेहरा उघड झाला आहे हे केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी नेहमीच आपल्या भाषणात म्हणतात की नागपुरातील ६० टक्के मुस्लिम मत मिळतात तरी सुद्धा नागपूरचे खासदार असून हज उडान बंद झाली तरी त्यांनी काहीच हलचल केली नाही ही बाब दुर्दैवी आहे. या बाबतीत सर्व पक्षे नेते एकत्रित झाले नाही तर किंवा आमच्याही पक्ष्यातील नेते या आंदोलनात सहभागी झाले नाही तर व ही उड़ान सुरु करण्या साठी आंदोलनात उतरले नाही तर त्यांच्याही तोंडाला काळ फासल्या शिवाय राहणार नाही असे आव्हान बंटी शेळके यांनी केले.नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेस जेथे जेथे आर एस एस व भाजपा आपला एजेंडा राबवेल तेथे तेथे त्यांना कडाकून विरोध करेल व तीव्र आंदोलन करण्यात येहील।

आजच्या या आंदोलनात नगरसेवक कमलेश चौधरी,पूर्व नागपूर ब्लॉक अध्यक्ष अयाज़ शेख,युवक कॉंग्रेस महिला अध्यक्ष विक्टोरिया फ्रांसिस,रिज़वान रुवमी,शाहबाज खान चिस्ती यांचे भाषणे झाले यात प्रामुख्याने नगरसेविका आशा नेहरू उइके,नगरसेविका जीशान मुमताज,नगरसेविका सईदा बेगम,हसमुख छागलानी,हाजी असदउल्लाह साहब,अयाज शेख,पप्पू पटेल,फरदीन गनी खान,शाहबाज खान,शेख अजहर,इमरान पल्ला,रिज़वान रुम्वी,नवेद शेख,जुनैद शेख,मोहसिन खान, स्वप्निल बावनकर,इब्राहिम पठान,स्वप्निल ढोके,अक्षय घाटोले,राजेंद्र ठाकरे,नकिल अहमद,शेख इस्माइल भाई,शेख सुभान भाई,सईद कुरेशी,फैज़ान क़ुरैशी,राहील शेख,जयेद अंसारी,आसिफ शेख,आसिफ अंसारी,जावेद भाई,शारीक खान,अल्तमश साजिद,अशफाक भाई,रियाजुद्दीन क़ुरैशी,मो.अफरीदी,मो.सरफराज,मो.हाशिम,पूजक मदने,सौरभ शेलके,देवेंद्र तुमाने,आशीष लोनारकर,सरफराज अंसारी,गोलू श्रीवास,डॉ.आसिफ पटेल,सलीम असलम,जुनैद पठान,ओमदीप झाड़े इत्यादि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तिथ होते.