कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील यशवंत विद्यालय वराडा येथे विविध शालेय स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमा सह वार्षिक स्नेह संमेलन थाटात संपन्न झाले. ” मराठी शाळेतुनच विद्यार्थ्यातील सुप्त गुणाच्या विकासाला चालना देऊन सुसंकृत, बौध्दीक, शारिरीक, सांंस्कृतिक व सामाजिकदुष्टया खरे शिक्षणाचे कवच कुंडले बहाल करून देशहित जोपासणारे उद्याचे योग्य नागरिक घडविले जातात.” असे गौरवास्पद मार्गदर्शन मा प्रकाश भाऊ जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी खासदार हयानी यशवंत विद्यालय वराडा येथील स्नेह संमेलनात केले.
बुधवार दि.२२/०१/२०२० ला आंनद मेळाव्याचे उद्घाटन सौ मिनाक्षी बेहुणे सरपंचा ग्रा प घाटरोहणा (एंसबा) यांच्या हस्ते व प्रमुख अतिथी सौ उषाताई गि-हे सदस्या ग्रा प घाटरोहणा (एंसबा), कु. योगिता ठाकरे माजी विद्यार्थीनी वराडा यांच्या उपस्थित करून वार्षिक स्नेह संमे लनाची सुरूवात करण्यात आली. दि.२३ ला क्रिडा स्पर्धाचे श्री महेश वानखेडे कुस्तीपटु, माजी विद्यार्थी यांचे हस्ते उद्घा टन व श्री भुषणराव निंबाळकर संचालक यशवंत विद्याल वराडा यांंच्या अध्यक्षेत प्रमुख पाहुणे मा देविदास जामदार माजी सभापती कृउबास पारशिवनी, मा अनंत कुमार खंडारे पोलीस उपनिरिक्षक महा मार्ग रामटेक कॅम्प वराडा, मा देवाजी शेळकी माजी उपसभापती यांंच्या उप स्थित करण्यात आले.
दि.२३ व २४ दोन दिवस विविध सांघिक, वैयक्तिक मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. शनिवार दि.२५ ला दुपारी १२ वा सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सौ मीना प्रफुल्ल कावळे सभाप ती प स पारशिवनी, यांंच्या हस्ते व श्री भुषणराव निंबाळकर संचालक यशवंत वि वराडा यांंच्या अध्यक्षेत प्रमुखअतिथी मा प्रकाश भाऊ जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख नागपुर शहर, माजी खासदार राम टेक, सौ निकिता भारव्दाज सदस्या प स गोंडेगाव, सौ विद्या चिखले सरपंचा ग्रा प वराडा, सौ उषा हेटे उपसरपंचा ग्रा प वरा डा आदि च्या उपस्थित दिप प्रज्वलित करून करण्यात आले.
याप्रसंगी मा संज य ठाकरे, सुरज काळे सदस्य एंंसबा, मा दिंगाबर ठाकरे माजी सरपंच घाटरोहणा, मा गेंंदलालजी ठाकरे माजी सरपंच वरा डा, अभय हेटे माजी सदस्य वराडा,इंजि. पांडे, प्रफुल्ल कावळे, दिलीप राईकवार, सिताराम भारव्दाज, रामभाऊ ठाकरे, गोपालजी गि-हे सह मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यानी एकल न्रुत्य, सामूहिक न्रुत्य, नाटिका आदींचे उत्कृष्ट सादरीकर णासह अंध श्रध्दा, व्यसन मुक्ती, शिक्षणा चे महत्व आदीचे मार्मिक प्रबोधन करीत प्रेक्षकांची मने जिंकली. दि.२६ जानेवारी ला सकाळी ८ वा. श्री भुषणराव निंबाळ कर शाळेचे संचालक यांचे अध्यक्षेत व सौ विद्या दिलीप चिखले सरपंचा ग्रा प वराडा यांंच्या हस्ते ध्वजारोहन करून प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला.
मान्यवराच्या हस्ते शालेय विद्यार्थ्याना बक्षीस वितरण करून वार्षिक स्नेह संमे लनाची सांगता करण्यात आली. कार्यक्र माचे आयोजन व शाळेचा प्रगतीचा गोष वारा प्रास्ताविकातुन मुख्याध्यापिका के बी निंबाळकर हयानी दिला. सुत्रंंचालन आर व्ही गणवीर यानी तर आभार क्रिडा शिक्षक आर बी गभणे यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सौ ए आर शिंगणे, कु अश्विनी खंडाळ, कु रूपाली चिखले. सतिश कुथे, आर जी राऊत, एम व्ही रहाटे, डी एम पांडे. विद्या र्थी प्रतिनिधी रोहित ठाकरे, मिनल नाक- तोडे सह विद्यार्थी व पालकांनी सहकार्य केले.