Published On : Fri, Oct 13th, 2017

राज्यातील वीज कर्मचार्‍यांना १३,५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण व सुत्रधारी कंपन्यांतील सुमारे ७७ हजार कर्मचार्‍यांना १३,५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळें यांनी जाहीर केले. तसेच कंत्राटी कामगारांना ७,५०० रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.

नागपूर येथील बिजली नगर येथे ऊर्जामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सानुग्रह अनुदानाबाबत बैठक झाली. बैठकीला तिनही कंपन्यांचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सर्वश्री सचिन ढोले, विनोद बोंन्द्रे आणि सुरज वाघमारे यांचेसह वरिष्ठ अधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ऊर्जामंत्र्यांनी सानुग्रह अनुदानाबाबतची घोषणा केली. ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळें यांनी घेतलेल्या या निर्णयामुळें वीज कर्मचा-यामध्ये समाधानाचे वातावरण आहे