Published On : Fri, Oct 13th, 2017

कांद्री गावात राजकिय गालबोट

Advertisement

कन्हान : कांद्री येथील ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीला आज अचानक राजकिय गालबोट लागले. स्थानिक आमदारांच्या इशारा वरून पोलीसांनी बॉनरची तोडफोड केली. असा आरोप करीत कॉँग्रेस पक्षाने हंगामा उभा केला. या प्रकरणात माजी राज्यमंत्री तथा कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष यांनी उडी घेतल्यामुळे राजकिय विरोधाची धार अधिकच तेज झाली.

कॉद्री ग्राम पंचायतीची सार्वत्रिक निवडणुक १६ ऑक्टो. रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकी संधर्भात भाजपा उमेदवाराचा सर्मथात कार्यकर्ता प्रचार बैठक घेण्याकरिता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार डी एम रेडडी, कांद्री गावातीलच श्री गि-हे यांच्या घरी आले होते. तर आजच कॉँग्रेस पक्ष समर्थित उमेदवाराच्या प्रचारासाठी त्या पक्षाच्या वतीने जाहीर विकासनाम्याचे मोठमोठे बँनर गावात जागोजागी लावले होते.

यात कॉँग्रेस पक्षाने मुकुल वासनिक यांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा गौरव करून संध्याचे खासदार कुपाल तुमाने व आमदार डी एम रेडडी यांच्या निष्कीयतेचा पाढाच वाचला होता. सदर बँनरची गावात उलटसुलट चर्चा सुरु होती. आज बैठकीच्या वे़ळेस आमदार रेडडी यांना ही बाब खटकली त्यानी सदर बँनरवर आक्षेप घेत थानेदार काळे यांना बँनर काृढुन टाकण्याची सुचना केली. थानेदारांनी या प्रकरणात उडी घेत काही पोलीस कर्मचा-या हाताने बँनर काृढण्यांचा प्रयत्न केल्याचा आरोप कॉँग्रेस पक्षाने केला.

कॉँग्रेस पक्षाने या कृतीवर हरकत घेत आमदार व पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत वातावरण तंग केले. कॉँग्रेस पक्ष समर्थित ग्राम विकास एकता पँनलचे सरपंच पदाचे उमेदवार बळवंत पडोळे, कॉँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे, तालुकाध्यक्ष दयाराम भोयर, जि प सदस्य शिवकुमार यादव, बबलु बर्वे व इतर १७ उमेदवारानी आमदार व थानेदार भेट यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करित या प्रकरणाची तक्रार भ्रमणध्वनी वरून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली.

घटनास्थळाला कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त़था माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी भेट देऊन कार्यकर्ताच्या भावना जाणुन घेऊन पोलीस प्रशासनाला योग्य कार्यवाही करण्याची विनंती केली. घटनास्थळाला पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे यांनी आपल्या दलबलसह ठाम माडुन प्रकरण निस्तारण्याचा प्रयत्न केला. वृत्त लिहिस्तोवर कॉँग्रेस पक्षाने उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या कडे आमदार डी एम रेडडी, थानेदार काळे व विरोधी पक्षातील काही कार्यकर्ते विरोधात तक्रार दाखल केली.