Published On : Wed, Oct 14th, 2020

शहर मतदारसंघ निहाय महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या तातुका कार्यकारीणीची घोषणा

म.रा. शिक्षक परिषदेच्या तालुका कार्यकारिणीची घोषणा नुकतीच १३ ऑक्टोवर २० रोजी, पंडीत बच्छराज व्यास विद्यालय, राजाबाक्षा नागपूर येथे शहर कार्यकारीणीची सभा आयोजित करण्यात आली. सत्र २०२०-२१ व २०२१-२२ करीता शहर मतदारसंघ निहाय नवनिवाचित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नागपूर शहरातील ६ ही तालुक्यातील नवनिवांवित तालुका कार्यकारीणीची अधिकृत घोषणा ना.आमदार नागो गाणार व शहर अध्यक्ष सुभाष गोतमारे यांनी केली.

तसेच सर्व तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य यांचा परिचय व त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्याच्या महिला आघाडी प्रमुख सौ.पुजाताई चौधरी, विभाग कार्यवाह योगेश बन, शहराचे पालक तुलारामजी मेश्राम उपस्थित होते.

याप्रसंगी
१)नविन शैक्षणिक धोरण
२) संघटनेत पदाधिकारी व सदस्यांची भूमिका व शिक्षकांची कार्यपध्दती
३) डीसीपीएस व एनपीएस बाबत प्रमुख सभेला उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.


सदर सभेला संपूर्ण नागपूर शहर अंतर्गत दक्षिण नागपूर, मध्य नागपूर, पुर्व नागपूर, पाश्चिम नागपूर, दक्षिण- पश्चिन नागपूर व उर्दु विभाग कार्यकारीणीची नवनिवाचित पदाधिकारी यांचा परिचय व स्वागत कार्यक्रम घेण्यात आला. ना. सुभाष गोतमारे शहर अध्यक्ष अध्यक्षस्थानी होते.

मार्गदर्शक तथा वक्ते मा.नागो गाणार शिक्षक आमदार नागपूर विभाग तथा राज्य कार्याध्यक्ष, म.रा.शि.प. मा.श्री.योगेश बन, नागपूर विभाग कार्यवाह, सौ.पुजाताई चौधरी राज्य महिला आघाडी प्रमुख, श्री. तुलारामजी मेश्राम, पालक नागपूर शहर आदीची उपस्थिती होती.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधिर वारकर, नागपूर शहर कार्यवाह यांनी तर आभार प्रदर्शन ओवंत शेंडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अपंग समावेशित कृती समिती यांनी केले.