Published On : Mon, Jun 1st, 2020

अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Advertisement

नागपूर : मुत्सद्दीपण, दूरदृष्टी, ज्ञानलालसा, प्रजावात्सलता, न्यायदान, संरक्षणव्यवस्था, राजकारभाराचे कौशल्य, कर्तव्यकठोरता, बाणेदार, उच्च चरित्र्य, साधेपणा आदि गुणांसह विनयशीलता ज्यांच्या नसानसात भिनलेली होती व प्रशासकीय कौशल्याने ज्यांचे आजही नाव घेतले जाते अश्या खंबीर व्यक्तिमत्वाच्या धनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंती ‍ निमित्त आज 31 मे (रविवारी) नागपूर महानगरपालिके तर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.

अहिल्यादेवी यांचा जन्म 31 मे, 1725 रोजी महाराष्ट्रातील बिड जिल्हयातील चौंडी या गावी शिंदे घराण्यात झाला. वयाच्या आठव्या वर्षी इंदूरच्या होळकर घराण्याच्या सून झालेल्या अहिल्यादेवींनी आपल्या कर्तृत्वाने राज्यात अनेक प्रशासकीय सुधारणा करुन उत्तम राज्यव्यवस्था उभी केली.

म.न.पा. केंद्रीय कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीतील दालनात उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे व म.न.पा. आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करुन आदरांजली दिली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी यांच्यासह मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.