
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव रंगारी येथे उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून पानठेला चालकावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
माहितीनुसार, दहेगाव रंगारी येथील उड्डाणपुलाखाली असलेल्या पानठेल्यावर राहुल मोरेश्वर भोयर हा आपल्या मित्र प्रणय श्रीवास याच्यासोबत बसला होता. त्यावेळी गावातील रूपचंद उर्फ कटर रविदास तेथे आला आणि राहुलकडे खर्रा मागू लागला. मात्र, राहुलने आधीची उधारी फेडण्यास सांगितल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला.
शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर काही क्षणांतच हिंसक संघर्षात झाले. संतापलेल्या रूपचंदने राहुलला धमकावत खिशातून चाकू काढला आणि त्याच्या पोटात वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना पानठेल्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या प्रकरणी प्रणय श्रीवास यांनी दिलेल्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. घटनेनंतर फरार झालेल्या रूपचंद उर्फ कटर रविदास याचा शोध घेत पोलिसांनी दोन दिवसांत त्याला अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून त्याचा गुन्हेगारी इतिहास आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खापरखेडा पोलीस करीत आहेत.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
सतीश उके ने मामलों पर उठाए सवाल; दबाव में शिकायत दर्ज कराने...
दो दुष्कर्म मामलों से शहर मै मची सनसनी #nagpurnews #crime #latestnews
गिट्टी खदान में हथियारों के जखीरे का भंडाफोड़ ...#latestnews #crime #nagpurnews #maharashtranews
नई पानी की टंकी में नहा रहे नाबालिग बच्चे ... #latestnews #newsupdate...







