Published On : Wed, Jun 24th, 2020

..आणि कोरोना काळात भटक्या श्वानाला मिळाले जीवनदान…..

Advertisement

कोरोना काळात माणुसकी चे उदाहरण: लोखंडी ग्रील (फाटकात) गळफास लागलेल्या भटक्या श्वानाला जीवनदान ….

नागपूर : सध्याच्या धावपळीच्या काळात जिथे लोकांना कोणाचा अपघात झाला, रस्त्यावर कोणी जखमी माणूस दिसला तर त्याला दवाखान्यात न्यायला वेळ नाही त्याच्याकडे लक्ष देण्याची मानसिकता नाही अश्यावेळी आणि तेही ह्या कोरोना काळात.. मूक प्राणी, श्वान (कुत्रा) अथवा पक्षी ह्यांना वाचविणे असे उदाहरण फारच कमी मिळतील… त्यातल्या त्यात भटक्या श्वान ला वाचवण्याची उदाहरणे मोजकीच

पण नुकताच टेलिकॉम नगर नागपूर येथील सजग नागरिक आणि ज्याला खरेच देव माणूस म्हणता येईल (संकट काळात मदत करणारा तो देव माणूस) असा गणेश दाम्पत्य ह्यांचे संयुक्त प्रयत्नाने माणुसकी जिवंत आहे ह्याचे उदाहरण पुन्हा समोर आले.

झाले असे कि सोमवारी, दि २२ जुने २०२० ला रात्री आलेल्या प्रचंड पावसात लपण्यासाठी अथवा अन्न शोधण्याच्या प्रयत्न करीत असताना जागा शोधात असताना रस्त्यावरचा भटका श्वान दुर्गा ज्योती अपार्टमेंट टेलीकॉम नगर च्या लोखंडी ग्रील (फाटकात) अटकला. त्याची मान इवढी लोखंडी ग्रील मध्ये फसली आणि त्यातून सुटन्या करिता केलेल्या जवळपास १ तास प्रयत्नमुळे त्याला गळफास च लागला होता. लोखंडी ग्रील च्या जाली मध्ये अडकलेल्या आणि मरण प्राय यातना सहन करणाऱ्या भटक्या कुत्र्याला काढायचे कसे ह्या विवंचनेत सचिन द्रवेकर असताना अचानक संकट काळात मदत करणारा तो देव माणूस – गणेश आणि त्याची पत्नी असे दाम्पत्य जे कामा वरून घरी जात होते ते थांबले..

गणेश नावाचा तो सद्गृहस्थ आणि अस्मादिक (सचिन द्रवेकर ) ह्यांनी जवळपास १ तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्याला सुखरूप मरणप्राय वेद्नातून काढण्यात यश आले आणि निष्पाप भटक्या जीवाला जीवनदान मिळाले.

…..जवळपास एक तास भटक्या कुत्र्या ने त्या लोखंडी ग्रील मधून स्वत ला सोडविण्याचा प्रयत्न केला असेल पण त्यामुळे थो घाबरून गेला होता आणि ठाकला हि होता आणि मरण प्राय वेदना मध्ये लटकून राहिले..

हा सर्व प्रकार त्या मार्गाने येणाऱ्या जाणार्या बर्याच लोकांनी बघितला …त्या भटक्या श्वानाची तडफड बघितली …पण प्रत्येक जन आपल्यायला काय करायचेय , ते श्वान आता काही वाचत नाही, इतक्या रात्री कोण येणार , कसे काढणार ते मरणारच ह्या भावनेतून निघून गेला.

जेव्हा हि बाब तीथेच राहनारे सचिन द्रवेकर, सिद्धेश नाजपांडे आणि मिंटी शहारे आणि ह्यांना कळली तेव्हा प्रथम सचिन द्रवेकर, सिद्धेश नाजपांडे दोघांनी शक्य ते प्रयत्न करून पाहिलेत आणि त्या मरणप्राय यातनातून श्वान ला सोडविण्याचा प्रथम प्रयत्न करून पहिला. पण गणेश नावाचा हा वाटसरू त्याच्या पत्नीसह थांबला आणि त्याच्या सूचनेवरून आणि त्याच्या कल्पकतेने गणेश आणि सचिन द्रवेकर ह्यांनी विविध उपाय करून बघितले आणि शेवटी त्या मरणप्राय यातना मधून सोडविले.

श्वानाच्या गळ्यावर खूप आवळला गेला होता थोडा वेळ झाला असता तर त्याचा गळा चिरला गेला असता. सर्वांनी केलेल्या सामुहिक प्रयत्नानंतर जीवघेण्या जाळ्यापासून भटक्या श्वाना ला मुक्त करण्यात यश आले.

आश्चर्य म्हणजे सुटका झाल्यावर श्वाना ने त्याच्या साथीदार सोबत येऊन गणेश आणि आम्हा सर्वाना शेपटी हलवून मान वंदनाच दिली.

येथे उल्लेखनीय आहे कि मागील वर्षी सचिन द्रवेकर आणि सिद्धेश नाज्पांडे ह्यांनी अग्निशमन पथक च्या साय्क्त मदतीने इक जंगली कबुतराला जीवघेण्या नायलोन मांजा तून सुटका करविली होती.