Published On : Wed, Nov 13th, 2019

बुद्धभूमी संरक्षण भिंतीजवळ अज्ञात तरुणाचे कुजलेले प्रेत मिळाले

नवीन कामठी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

Maharashtra Police

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कामठी नागपूर मार्गावरील बौद्ध भूमी संरक्षण भिंतीला लागून असलेल्या टिनाच्या शेडखाली अज्ञात 30 ते 35 वयातील तरूणाचे कुजलेले प्रेत मिळून आल्याने एकच खळबळ उडाली.

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर जबलपूर मार्गावरील खैरी शिवारातील बुद्धभूमी संरक्षण भिंतीला लागून असलेल्या एका टिनाच्या शेड खाली 30 ते 35 वयातील अज्ञात तरुणाचे कुजलेले प्रेत सकाळी दहा वाजता सुमारास मिळून आल्याने खळबळ उडाली होती घटनेची माहिती नवीन कामठी पोलिस स्टेशनला मिळाली असता पोलीस उपनिरीक्षक विनोद डोंगरे सहकार्‍यांसोबत घटनास्थळी जाऊन प्रेताची पाहणी केली

असता मृतकाचे अंगात निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट व काळाचौकटी शर्ट अंगात परिधान केला आहे आठ दिवसापूर्वी चे असल्याने कुजलेल्या अवस्थेत होते पंचनामा करून पोलिसांनी कामठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे असून नवीन कामठी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद डोंगरे करीत आहेत

संदीप कांबळे