Published On : Wed, Nov 13th, 2019

शेतकऱ्याच्या शेतपीकाचे झालेले नुकसान भरपाईची मागणी – मनसे

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे शेता तील पिकांचे मोठया प्रमाणात हानी झाल्याने तहसिलदार पारशिवनी हयाना निवेदनाने नुकसान भरपाईची मागणी मनसे तर्फे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारशिवनी तालुक्याच्या वतीने रामटेक विधानसभा श्रेत्रातील पारशिवनी तालुक्याती शेतक ऱ्याच्या शेतपिकाचे अवकाळी पावसाने मोठय़ा नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रत्येकी एकरी २५००० रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारशिवनी तालुक्याचे शिष्टमंडळ तहसिलदार पारशिवनी हयाना भेटुन निवेदन देऊन करण्यात आली.

शिष्टमंडळात मनसे पारशिवनी तालुका उपाध्यक्ष रोशन फुलझेले, रामटेक तालुका अध्यक्ष शेखरभाऊ डुंडे, नरेंद्र पांडे, मनोजभाऊ पालिवाल, विक्की नांदूरकर प्रामुख्याने उपस्थित होते.