Published On : Thu, Jul 8th, 2021

एका प्रकरणाच्या तपासात जुन्या चोरीचा छडा

Advertisement

-इतवारी लोहमार्ग पोलिसांचे कौशल्य

नागपूर– गोंदिया – इतवारी दरम्यान धावत्या रेल्वेतील चोरी प्रकरणाचा तपास करीत असताना अन्य गुन्ह्याचा छडा लावण्यात इतवारी लोहमार्ग पोलिसांना यश मिळाले. कौशल्याचा वापर केल्यामूळे दोन वर्षापूर्वीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्तही करण्यात आला. भारती पात्रे (३३), रा. पारशिवनी असे त्या महिलेचे नाव आहे.

Advertisement
Advertisement

३० जून रोजी गोंदिया- इतवारी मेमू प्रवासादरम्यान महिला प्रवाशांचे दागिने चोरी करून आरोपी महिला कळमना रेल्वे स्थानकाच्या बाहेर थांबल्या होत्या. इतवारी लोहमार्ग पोलिसांनी चारही महिलांना ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला. तसेच न्यायालयाच्या आदेशाने त्यांना कारागृहात पाठविले. दरम्यान दोघांची जामिनावर सुटका झाली तर दोघ्या कारागृहात आहेत. सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख यांच्या निर्देशाने जामिनावर बाहेर आलेली स्वाती हिची पुन्हा चौकशी केली असता तिने धक्कादायक खुलासा केला. भारतीने २०१९ मध्ये रेल्वेने प्रवास करणाèया महिलेचे दागिने चोरले होते. ते दागिने स्वत वापरत असल्याचेही पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी चोरीतील मंगळसुत्र (वजन १.५ ग्रॅम), चांदीची पायपट्टी, असा एकूण १४८०० रुपयांचा मुदेदमाल जप्त केला. दरम्यान जुना अभिलेख तपासल्या नंतर यातील फिर्यादी महिला मस्कासाथ, इतवारी येथील रहिवासी असल्याचे समजले. पत्यावरून त्यांना पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले. त्यांनी आपले दागिने ओळखले.

यावरून भारती हीला अटक करून गुन्हयाता कलम ४११ भादवी प्रमाणे वाढ करण्यात आली तसेच न्यायालयात हजर करण्यात आले. अशा प्रकारे इतवारी लोहमार्ग पोलिसांनी एका प्रकरणाच्या तपासात कौशल्याचा वापर केल्याने जुन्या प्रकरणाचाही छडा लावण्यात यश मिळाले. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात सपोनि मुबारक शेख यांच्या नेतृत्वात लोहमार्ग पथकाने केली.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement