Published On : Thu, Oct 8th, 2020

ATM मशीन कापून पैसे चोरी करणारी अंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखा ने केले जेरबंद

Advertisement

नागपुर/रामटेक – दि.०३/१०/२०२० रोजी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे मनसर येथील बँक ऑफ इंडियाचे ATM मशीन गॅस कटरने कापून त्यामधील १९९०५००/- रुपये रोख रक्कम चोरीला गेसल्याने पोलीस स्टेशन रामटेक येथील अपघात क्रमांक ५६७/२०२० अन्वये गुन्हा नोंद असून सादर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्ह्यातील आरोपींतांचा शोध घेण्यासाठी मा.पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांना समांतर तपास करण्याचे निर्देश दिल्याने.

त्या अनुसंगने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांनी ४ विशेष तपास पथके तयार करून तपासणी सुत्र हलविले त्यातच प्राप्त माहिती अनुषंगाने दि.०४/१०/२०२० रोजी सदर गुन्हयात ट्रक क्रमांक RJ14GK-6949 चा वापर केल्याने माहिती झाले यावरून सदर ट्रक कोणत्या मार्गाने गेलेला आहे याची माहिती घेतली असता सदरचा ट्रक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ ने हैदराबाद मार्गाने चेन्नई येथे निघून गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा विशेष पथकाने सदर ट्रकचा पाठपुरावा करून चेन्नई येथे शोध घेतला असता ट्रक चेन्नई येथील फॉरेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या रबर कंपनीत गेल्याची माहिती हाती लागली त्यावरून चेन्नई येथील स्थानिक पोलीस ठाणे दुसी पोलिसांची मदत घेतली असता त्यांचेसह फॉरेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत जावून वरील ट्रक ताब्यात घेतला.

ट्रक चालक-मालक आरोपी क्र.
१) साजिद रशीद खान, वय २८ वर्षे रा.पचगांव तह. ताऊरू जिल्हा नुह( मेवात) हरियाणा व त्यांचेसोबत ट्रकमध्ये असेलेले त्याचे ३ साथीदार
२) अहमद्दीन उस्मान वय २२ वर्षे रा.नल्लड तह.जि.नुह
३)तौफीक मंमरेजखान वय २७ वर्षे ट्रक चालक रा.खातीवास तह. तिजारा जि. अलवर (राजस्थान )आणि
४) जैनुलआबदीन उर्फ दुर्र वल्द अयुब खान वय २२ वर्षे रा. शिकारपूर तह. ताऊरु जिल्हा नुह त्यांचेवर संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेवून उपरोक्त ट्रकसहा आरोपीना नागपूर येथे सस्थितीत आणले.

विचारपूस दरम्यान वरील आरोपीनी गुन्हा केल्याचे सांगितले व सदर गुन्हयात त्यांचे व्यतिरिक्त त्यांच्या आणखी २ साथीदार
१) काला व २) ताजीर उर्फ पैलवान हे असल्याचे सांगितले. त्याचे दोन्ही साथीदारा हे नेल्लोर येथे पळून गेल्याची माहिती समोर आली .तसेच पोलीस स्टेशन देवलापार अप.क्र. २००/२०२० मधील गुन्ह्यातील ATM फोडण्याचा प्रयत्न यापूर्वी जुलै २०२० मध्ये पोलीस स्टेशन सावनेर अप.क्र ३१९/२०२० गुन्ह्यातील धापेवाडा रोड वरील ATM फोडल्याचे सांगतात. त्याचबरोबर तेलंगाना येथील नालगुंडा येथे सबी बँकेचे ATM गॅस कटरने तोडल्याचे सांगितले आहे.

आज दि.०७/१०/२०२० रोजी आरोपी साजिद वल्द राशिद खान आणि त्यांचे इतर तिन साथीदार यांचे जवळील ट्रक क्रमांक RJ14GK6949 ची कायदेशिररित्या झडती घेतली असता ट्रक केबिनमधील एका छुप्या कप्प्यात एक काळया रंगाची बॅग मिळून आली.त्या बॅगची पाहणी केली असता,त्यामध्ये नगदी ९,५०,०००/- रुपये मिळून आले.मिळून आलेल्या रक्कमेबाबत आरोपी साजिद यांने सांगितले की त्यांच्या साथीदार काला,ताजीर,तौफीक,दुर्र आणि अहमददीन यानी दि.०३/१०/२०२० रोजी पहाटे ४.०० वजताचे सुमारास मनसर येथील बँक ऑफ इंडिया ATM मशीन गॅस कटरने कापून सदरचे पैसे चोरी करून मिळविले असल्याचे सांगितले.यानंतर ट्रकांची संपूर्ण झडती घेतली यांना केबिनवरील वरच्या बाजूला एक गॅस सिलेंडर, एक ऑक्सीजन सिलेंडर, आणि गॅस कटर असे मिळून आले. तसेच ट्रक मध्ये दोन मोबाईल फोन मिळून आले.यावरून आरोपींतांचे ताब्यातून गुन्हयात वापरलेल्या ट्रक सहा एकूण ४९,७६,९००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह )श्री. संजय पुरंदरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अनिल जिट्टावार यांचे आदेशाने विषेश पथकातील सहा. निरीक्षक जितेंद्र वैरागडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते,पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे, पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख व स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सहा. लक्ष्मीप्रसाद दुबे, पोलीस हवालदार नाना राऊत , महेश जाधव ,गजेंद्र चौधरी, सुरज परमार,निलेश बर्वे, राजेंद्र सनोंडीय, रमेश भोंयर,मदन आसतकर, चंद्रशेखर घडेकर, विनोद काळे,पोलीस नायक दिनेश आधापुरे,रामराव आडे, सुरेश गाते, अरविंद भगत, शैलेष यादव,पोलीस शिपाई अमोल वाघ,विपिन गायधने, रोहन डाखोरे,प्रणय बनाफर, बालाजी साखरे,विरेन्द्र नरड़ ,महिला कॉन्स्टेबल नम्रता बघेल आणि चालक सहा. फौज. साहेबराव बहाळे, पोलीस हवालदार भाऊराव खंडाते ,पोलीस नायक अमोल कुथे तसेच सायबर सलचे पोलीस निरीक्षक कदम, पोलीस शिपाई सतीश राठौड़ तसेच पोलीस स्टेशन रामटेक येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे,पोलीस हवलदार रामेश्वर रावते, पोलीस नायक गजानन उकेबोद्र,पोलीस शिपाई तुषार कुडुपल्ले यांचे पथकाने पार पाडली .

दिनेश दमाहे 9370868686