नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वाटर (ओसीडब्ल्यू) नागपूर शहरातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि शुध्द पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी अखंड प्रयत्न करीत आहेत. परंतू या सेवेमध्ये अवैध नळ जोडणी ही मोठी बाधा ठरत आहे. जलवाहिनीतील एका अवैध नळ जोडणीमुळे संपूर्ण परिसरातील पाणी प्रदूषित होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी अवैध नळ जोडणीबाबत सजग रहावे व अवैध नळ जोडणीला विरोध करावे आणि आपल्या शहराचे रक्षण व्हावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिका व ओसीडब्ल्यू द्वारे करण्यात आले आहे.
अवैध नळ कनेक्शन्समुळे विविध प्रकारे परिसरातील पाण्यात प्रदूषण होऊ शकते. अवैध टॅपिंग अर्थात पाणी पुरवठा सुरु असलेल्या पाइपमध्ये ड्रिलिंग करून त्यातून नळ जोडणी करणे हे अत्यंत धोकादायक ठरते. पाणी फिल्टर होत नाही जॉइंटमध्ये सीलिंग होत नाही त्यामुळे जलवाहिनीमध्ये भंगार तयार होतो. बॅक-सिफोनज म्हणजेच कमी दाबात पाणी (intermittent supply) पुरवठा असल्याने पाइपमध्ये बाहेरील दूषित पाणी शोषले जाते यामुळे पाण्याचा प्रवाह विरुद्ध दिशेला होतो.
दूषित परिसरांमधील टॅपिंग हे सर्वसाधारणपणे गर्दीने वास्तव्य असलेल्या, पुरेसे ड्रेनेज नसलेल्या भागात होते, तिथे सांडपाणी किंवा गटाराचे पाणी पाईपलाईनजवळ साचते. अशा भागात भेगा पडलेल्या टॅपिंग पॉइंट्स मधून बॅक्टेरिया, विषाणू सहज प्रवेश करू शकतात. दूषित पाणी पिल्याने अतिसार, कॉलरा, टायफाइड, हेपॅटायटीस, डायरिया यांसारख्या जलजन्य रोगांना आमंत्रण मिळते.
अशा जोडण्या बहुतेक वेळा अनधिकृत वस्ती, अपुरी ड्रेनेज यंत्रणा असलेल्या भागांमध्ये आढळून येतात, जिथे गटाराचे पाणी पाइपजवळ साचते. त्यातून बॅक्टेरिया सहज आत प्रवेश करू शकतात.
उपाय आपल्याच हातात; काय करणार?
मनपा व ओसीडब्ल्यू कडून कायदेशीर, मीटर कनेक्शनसाठी अर्ज करा. अनधिकृत कनेक्शन्सची माहिती ओसीडब्ल्यू च्या 1800 266 9899 या हेल्पलाईन वर कळवा. डिस्कनेक्शन मोहिमेला सहकार्य करा. यामुळे पाणी चोरी कमी होणार, दाब सुधारेल.
अवैध नळ जोडणीमुळे काही पैशांची बचत होत असली, तरी त्यातून आपल्याच मुलांच्या, कुटुंबाच्या व शेजाऱ्यांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा अपायकारक पद्धतींना विरोध करा व प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित जलपुरवठ्यास हातभार लावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिका व OCW कडून करण्यात येत आहे.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.