Published On : Fri, Feb 28th, 2020

शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हत्तीरोग दुरीकरण मोहिम प्रशिक्षण कार्यक्रम

सेवन तीन औषधांचे, करील उच्चाटन हत्तीरोगाचे

कामठी :-हत्तीरोग चे मुळातून उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शहरातील 100 टक्के जनतेला हत्तीरोग प्रतिबंधक औषधींचा लाभ मिळावा यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने 2 मार्च पासून हत्तीरोग निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेसंदर्भात ग्रामस्थांचा अधिकाधीक प्रतिसाद प्राप्त होत हत्तीरोग नियंत्रणात येण्यासाठी जनजागृतीपर शासकीय उपजिल्हा रुग्णालय कार्यालयात .हत्तोरोग निर्मूलन मोहिम अंतर्गत नागरिकांना औषध खाऊ घालणाऱ्या कर्मचारी व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले .

या मोहिमेत स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी आदी घरोघरी जाऊन औषधीचे वितरण करनार आहेत .तेव्हा सेवन तीन औषधांचे करील उच्चाटन हत्तीरोगाचे या संकल्पनेतून घरोघरी होणाऱ्या हत्यीरोग निर्मूलन औषधीचे स्वयंस्फूर्तिने सेवन करावे असे आव्हान शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ धीरज चोखांद्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर यांनी यावेळी केले.याप्रसंगी आरोग्य सहाययक नर्सिकार, विनोद बाराहाते, फुलझेले, धावडे , ,आदी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी