कामठी :- मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने नागपूर जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव बावनकुळे यांच्या शुभ हस्ते कामठी तालुक्यातील सत्कारमूर्तींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. .
यानुसार दैनिक देशोन्नती च्या माध्यमातून पत्रकार संदीप कांबळे तसेच दैनिक नवराष्ट्र च्या माध्यमातून पत्रकार प्रेम शर्मा यांनी मराठी भाषेला मान गौरव मिळवून देण्यात वृत्तसंकलनातून मोलाची भूमिका साकारत असल्याने या दोन्ही पत्रकारांचा सत्कार करण्यात आला तसेच संगीत साहित्य क्षेत्रात खेडोपाडी तमाशा गोंधळ सामाजिक कार्यात मराठी भाषेला गौरव मान मिळवून देणाऱ्या राजू बावनकुळेसह , मराठी विषयात प्रावीन्यप्राप्त असलेले उर्दू शाळेतील शिक्षक अब्दुल रफिक खान यांचाअ सुद्धा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल बावनकुळे, शहर अध्यक्ष प्रशांत खोब्रागडे, तालुका उपाध्यक्ष शामु महेंद्र, छावणी क्षेत्राचे अध्यक्ष , कामठी शहर उपाध्यक्ष शिवा वाळवे, शैलेश पाटील, विजय बारई, चेतन शिवणकर, अक्षय दुरगुळे, आकाश नानवटकर, प्रणय शेलोकर,करण जाधव, प्रमोद सूर्यवंशी, प्रतीक खेसे आदी उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी