Published On : Mon, Jul 20th, 2015

अमरावती : माकपाचे तिवसा नगरपंचायत समोर बेमुदत साखळी उपोषण

 

पाणीपुरवठा योजनेच्या चौकशीसह विविध मागण्यांचा समावेश 

Tiwsa Uposhan MAKPA

सवांददाता / हेमंत निखाडे

तिवसा (अमरावती)। तिवसा शहरात कार्यान्वित झालेल्या साडेआठ कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्या सह विविध मागण्यांना ठेऊन मार्क्सवादी कम्यूनिष्ट पक्षाच्या वतीने तिवसा नगरपंचायत समोर बेमुदत साखळी उपोषण सोमवार पासून सुरु करण्यात आल.

गेल्या अनेक दिवसांपासून तिवसा पाणीपुरवठा योजनेचा व अनियमित, गढूळ पाणीपुरवठा विषय शहरात चांगलाच पेटला आहे. तिवसा शहरवासीयांच्या प्रलंबित व दुर्लक्षित विविध समस्येला ठेऊन माकपाने हे उपोषण सुरु केले आहे. य़ाबाबत निवेदन संबंधितांना देण्यात आले आहे.

तिवसा शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामांची सखोल चौकशी करून भ्रष्टाचारी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर पुलिस कार्यवाही कार्यात यावी. तिवस्यातील सिमेंट कांक्रीट रोड, बाजार ओटे, नाल्या, रपटे इत्यादी सर्व प्रकारच्या बांधकामाची, गुणवत्ता नियंत्रकामार्फत सखोल चौकशी करून कार्यवाही व्हावी. १६७ ओबीसींचे मजूर घरकुल लाभार्थ्यांना जिलाधिकारी यांनी हस्तक्षेप करून मंजूर घरकुल वाटप करावे, बंद पडलेले महत्मा गांधी वाचनालय पूर्ववत सुरु करावे, तिवसा पंचवटी चुकत प्रवासी निवारा व प्रसाधनगृह त्वरित बांधावे, एसटी आगाराचे मंजूर काम त्वरित सुरु करावे अश्या विविध स्वरूपाच्या मागण्यांना घेऊन हे बेमुदत साखळी उपोषण सोमवारपासून सुरु करण्यात आले आहे.

माकपाचे तालुका सचिव महादेव गारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंना न्याय मिळावा यासाठी हे उपोषण असून त्यामध्ये पहिल्याच दिवशी महिलांनी सहभाग घेतला. त्यामध्ये शालू नेमाडे, मंदा मोरे, कुंदा वाघाडे, प्रमिला भामुक्रे तसेच रामदास जहाके व विठोबा काळे यांच्या समावेश आहे. मागण्यांची प्रशासनामार्फत पूर्तता होईपर्यंत हे उपोषण चालणार असून प्रशासनाने याबाबत दाखल न घेतल्यास उपोषण तीव्र करण्याचा इशारा माकपा ने दिला.