मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा आज (11 डिसेंबर) साखरपुडा होणार आहे.
अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा आज साखपुडा आहे. राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क इथल्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानावर घरगुती पद्धतीने हा साखरपुडा होईल.
अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. याच ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि आता लवकरच विवाहबंधनात होणार आहे.
विशेष म्हणजे, आज राज ठाकरेंच्या लग्नाचा वाढदिवसही आहे. त्यामुळे याच मुहूर्तावर दोघांचा साखरपुडा केला जाणार आहे. या सोहळ्याला कोण-कोण उपस्थित राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोण आहे मिताली बोरुडे?
मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. फॅड इंटरनॅशनलमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांची ती मुलगी आहे.
राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.
उद्धव ठाकरे येणार का?
महालक्ष्मी रेसकोर्सवर असलेल्या टोड्स हॉटेलमध्ये अमित-मितालीचा साखरपुडा होणार आहे. हा अत्यंत खाजगी सोहळा असेल. तर या सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल. अमित लवकरच मनसेच्या सक्रिय राजकारणात पूर्णपणे दिसण्याची शक्यता आहे. तसंच लवकरच मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदाची सूत्र अमित यांच्याकडे येण्याची शक्यता आ