Published On : Wed, Jun 6th, 2018

अमित शहा बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या घरी जाऊन भेट घेतली

मुंबई : भाजपच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने संपर्क मोहिम वाढवण्यास सुरुवात केली आहे. यासाठीच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई दौऱ्याचे नियोजन केले. मुंबई दौऱ्यात शहा-माधुरी भेटीची चर्चा रंगली होती. या दोघांच्या भेटीनंतर या भेटीचे रहस्य उघड झाले आहे.

आगामी २०१९ निवडणुकीच्या पार्शवभूमीवर भाजप सरकारने गेल्या चार वर्षात केलेली कामे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी एक विशेष कॅम्पेनची तयारी करत आहे. त्यासाठी लोकप्रिय कलाकारांच्या मदतीने जनतेपर्यंत कामे पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे असे समोर आले.

मात्र या भेटीची राजकीय वर्तृळात वेगळी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. भाजप माधुरीला राज्यसभेची ऑफर देण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत .

अमित शहा माधुरीची भेट घेऊन लता मंगेशकर या अजुन एक मोठ्या कलाकाराची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते विश्रांती घेऊन उद्योगपती रतन टाटा यांना भेटणार आहेत. त्यानंतर ते मातोश्रीवर जाणार आहेत.