Published On : Wed, Jul 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

दिल्लीत अमित शाह-फडणवीस यांची बंद दाराआड बैठक; राज्यातील घडामोडींवर सविस्तर चर्चा?

Advertisement

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. नर्मदा प्रकल्पासंदर्भातील बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये स्वतंत्रपणे बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक सुमारे तीन तास चालल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सूत्रांनुसार, या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, महायुती सरकारमधील विविध घडामोडी, तसेच मंत्रिमंडळ विस्तारासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. मात्र, बैठकीतील चर्चेचा अधिकृत तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी याआधी अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नर्मदा प्रकल्पाच्या बैठकीलाही हजेरी लावली. या बैठकीला गुजरातचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. नर्मदा नदीचे पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे विशेष लक्ष लागले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या घडामोडींनंतर पुढील राजकीय रणनीतीवरही या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

याशिवाय, केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.