
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण तापले आहे. NEET पेपर लीक प्रकरण आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर विविध विद्यार्थी संघटना व CJP कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला ‘चलो संसद’ मोर्चा संसद परिसराच्या दिशेने कूच करताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तातडीने भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
आंदोलनाची तीव्रता आणि संसद परिसरातील सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन अमित शाह यांनी वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणांसोबत आढावा बैठक घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान आणि अमित शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली असून आंदोलनाची स्थिती, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि कायदा-सुव्यवस्था या विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या-
मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी NEET पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आंदोलनाच्या वाढत्या दबावामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून विविध स्तरांवर चर्चांचे सत्र सुरू आहे.
सरकारकडून चर्चेचे संकेत-
दरम्यान, केंद्र सरकारने आंदोलकांशी संवाद साधण्याची तयारी दर्शवली आहे. CJP चे प्रतिनिधी सौरव दास आणि आशुतोष रांका हे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडणार असल्याचे समजते. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
संसद परिसरात कडक सुरक्षा; अमित शाह यांचे निर्देश-
मोर्चा संसदेकडे सरकल्यानंतर दिल्ली पोलिसांनी संसद मार्ग, सेंट्रल विस्टा आणि आसपासच्या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हलका लाठीचार्ज करण्यात आला. तसेच काही भागात अश्रुधुराचाही वापर करण्यात आल्याची माहिती आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
KYC के नाम पर ₹7.5 लाख साफ! #NagpurNews #CyberFraud #CyberCrime #OnlineFraud #KYCScam...
मालिक नहीं मिला तो कर्मचारी पर हमला! #NagpurNews #Crime #KnifeAttack #CrimeNews #MaharashtraCrime
मंगलसूत्र और सोने की मणि चोरी के दो मामले उजागर
वर्धा में ग्राम पंचायत कर्मचारियों का जिला परिषद पर मोर्चा #vidarbhanews #wardha...
नाना पटोले का अमित शाह पर तीखा हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha...
रत्नागिरी समुद्र तट पर पर्यटकों की कार फंसी #maharashtranews #ratnagiri #newsupdate #maharashtra




